बॉलिवूड अभिनेता वरुण धवन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. सोशल मीाडियावर व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून तो नेहमीच चर्चेत असतो. यावेळी वरुण एका लहान मुलामुळे चर्चेत आहे. त्याने अजब-गजब डान्स करणाऱ्या एका लगान मुलाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला आपले हसू रोखता येणार नाही.

वरुण धवनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. “लॉकडाउन संपल्यानंतर असा डान्स करुन मी आपला आनंद व्यक्त करणार आहे.” अशी गंमतीशीर कॉमेंट त्याने या व्हिडीओवर केली आहे. वरुणने शेअर केलेला हा व्हिडीओ आतापर्यंत आठ लाखांपेक्षा अधिक वेळा पाहिला गेला आहे.

 

View this post on Instagram

 

Once this ends I will celebrate like this

A post shared by Varun Dhawan (@varundvn) on

वरुण बॉलिवूडमधील सध्याच्या आघाडिच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. अभिनयासोबतच तो आपल्या अफलातून डान्ससाठी देखील प्रसिद्ध आहे. अलिकडेच त्याने स्ट्रिट डान्सर या चित्रपटामध्ये आपल्या जबरदस्त डान्सचे प्रदर्शन केले होते. या पार्श्वभूमीवर त्या लहान मुलाच्या डान्स स्टेप्स फॉलो करताना वरुण कसा दिसेल हे पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत.