scorecardresearch

लोकप्रियतेमध्ये विकीने केली ‘या’ सुपरस्टारवर मात!

तरुणींमध्ये विकीची कमालची क्रेझ आहे

लोकप्रियतेमध्ये विकीने केली ‘या’ सुपरस्टारवर मात!

अभिनेता विकी कौशल ‘मसान’, ‘संजू’, ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटांमुळे खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला. विकी केवळ प्रकाशझोतातच आला नाही तर त्याने लोकप्रियतेचं शिखरही गाठलं. अलिकडेच त्याचा ‘भूत’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामुळे त्याच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली असून तो बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता ठरला आहे. विशेष म्हणजे या लोकप्रियतेमध्ये त्याने शाहिद, टायगर आणि कार्तिक आर्यन या कलाकारांना मागे टाकलं आहे.

‘स्कोर ट्रेंड्स’च्या आकडेवारीनुसार,व्हायरल न्युज सेक्शनमध्ये विकीने १०० गुण मिळवत प्रथम स्थान पटकावलं आहे. ‘भूत’ चित्रपट आणि अभिनेत्री कतरिना कैफसोबतच असलेल्या मैत्रीमुळे तो सतत चर्चेत होता. त्यामुळेच त्याची लोकप्रियता झपाट्याने वाढली. तर शाहिद कपूरला ४६ गुण मिळाल्यामुळे तो दुसऱ्या स्थानावर आहे. शाहिद गेल्या काही दिवसापासून सतत चर्चेत होता. शाहिदचा अलिकडेच चित्रपटाच्या सेटवर अपघात झाल्यामुळे, मीरासोबत साजरा केलेला वाढदिवस अशा बऱ्याच कारणांमुळे शाहिद चर्चेत होतो.

अलिकडेच कार्तिक आर्यनचा ‘लव आज कल 2’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिवर फार काही कमाल करु शकला नाही. परंतु कार्तिकच्या लोकप्रियतेत मात्र वाढ झाल्याचं दिसून आलं. कार्तिक लोकप्रियतेमध्ये ४१ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर ३८ गुण मिळवतं टायगर श्रॉफ चौथ्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे कार्तिक, टायगर, शाहिद आणि विकी या सगळ्यांनी अजय देवगणला मागे टाकलं आहे. अजय ३६ गुण मिळवून चक्क पाचव्या स्थानावर आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या