अभिनेता विकी कौशल सोशल मीडियावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. पण सध्या विकीपेक्षा त्याचे वडील शाम कौशल हे सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्यांचे काही वर्काउट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे आता शाम कौशल यांचे व्हिडीओ पाहिल्यानंतर फिटनेसच्याबाबतीत ते विकीलाही टक्कर देत असल्याचं बोललं जात आहे.

सध्या शाम कौशल यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. तसं पाहायला गेलं तर शाम कौशल यांच्या व्हिडीओमध्ये हैराण होण्यासारखं असं काही नाही कारण ते स्टंट आणि अॅक्शन दिग्दर्शक आहेत. पण आता त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकरी त्यांच्या व्हिडीओवर धम्माल कमेंट करताना दिसत आहेत. त्यांच्या व्हिडीओवर कमेंट करताना अनेक युजर्सनी ‘आता कतरिना घरी आली आहे तर हे सर्व करावंच लागणार’ अशा आशयाच्या कमेंट केल्या आहेत.

upsc student surprised father with upsc 2023 result in his office then what happened you will get cry watch viral video
या आनंदाला तोड नाही! UPSC निकालानंतर वडिलांच्या ऑफिसमध्ये पोहोचला लेक अन्…; VIDEO पाहून पाणावतील तुमचेही डोळे
A young boy K Ayushmaan Rao dresses up as Ram Lalla
चिमुकला रामलल्ला पाहिला का? रामलल्लांच्या वेषभूषेतील रामभक्ताचा व्हिडीओ होतोय व्हायरल
two women fighting for seats in Delhi bus shocking video goes viral on social media
‘सीट’वरून दोन महिलांमध्ये तुफान राडा, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, VIDEO होतोय व्हायरल
Bengaluru woman slammed for phone
स्कुटर चालवताना मोबाईलवर बोलण्यासाठी काकूंचा हटके जुगाड! व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच

विकी कौशलचे वडील शाम कौशल यांनी बॉलिवूडच्या बऱ्याच चित्रपटांसाठी स्टंटमॅन दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. त्यांनी ‘कृष’, ‘कमीना’, अनुराग कश्यपचा ‘गँग्स ऑफ वासेपुर’, ‘रामलीला’, ‘धूम 3’, ‘गुंडे’, ‘बजरंगी भाईजान’, ‘दंगल’, ‘लक्ष्मी’ या चित्रपटांसाठी स्टंट दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. अशाप्रकारे व्हिडीओ व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकदा त्यांचे व्हिडी सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

विकी कौशलचे बाबा स्वतःच्या फिटनेसची नेहमीच काळजी घेताना दिसतात. ते ८० च्या दशकापासून चित्रपटसृष्टीशी जोडलेले आहेत. पण विकी आणि कतरिनाच्या लग्नानंतर ते सोशल मीडियावर जास्त चर्चेत आले आहेत. दरम्यान विकी कौशल आणि कतरिना कैफ राजस्थानमध्ये लग्नाच्या बेडीत अडकले होते. त्यांचं लग्न बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या लग्नांपैकी एक आहे.