बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाला आता बराच काळ लोटला तरी सुद्धा हा अजुनही चर्चेचा विषय आहे. कतरिना बऱ्याचवेळा विकी कौशलच्या कुटुंबासोबत दिसते. त्यांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतात. नुकताच कतरिनाने मोनोकिनीमधील तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो व्हायरल झाला असून विकी कौशलचे वडील शाम कौशल यांनी कतरीनाच्या या फोटोवर रिअॅक्ट केलं आहे.

कतरीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये कतरिनाने काळ्या रंगाची मोनोकिनी परिधान केली आहे. कतरिना या फोटोत खूप सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोवर कमेंटचा वर्षाव होतं आहे. पण या सगळ्यात विकीचे वडील शाम कौशल यांनी देखील आपल्या सुनेच्या या फोटोला लाइक केले.

आणखी वाचा : “मी कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही पण भारतातच…”, अजान, हनुमान चालीसा प्रकरणावर अनुराधा पौडवाल यांचे वक्तव्य चर्चेत

आणखी वाचा : दीपिकानेच शेअर केला आलिशान बेडरूमचा फोटो, पाहिलात का?

दरम्यान, कतरिना लवकरच सलमान खानसोबत टायगर ३ या चित्रपटात दिसणार आहे. या शिवाय ती फोन बूथ या चित्रपटात दिसणार आहे. या दोन चित्रपटांनंतर फरहान अख्तरच्या जी ले जरा या चित्रपटात आलिया भट्ट आणि प्रियांका चोप्रासोबत दिसणार आहे. दुसरीकडे, विकी ‘गोविंदा नाम मेरा’, तख्त’, ‘साम बहादुर’, ‘द अमर अश्वत्थामा’ आणि सारा अली खानसोबत लक्ष्मण उतेकर यांच्या चित्रपटात दिसणार आहे.