क्रिकेटपटू विराट कोहली त्याचे आयुष्य नेहमीच मजेत घालवण्याचा प्रयत्न करतो. मग ते क्रिकेटचे मैदान असो वा कोणाच्या लग्नातील कार्यक्रम. मैदानावर गोलंदाजांना नाचवणारा विराट खासगी जीवनात पंजाबी गाण्यावर स्वतःला थिरकण्यापासून रोखू शकत नाही. क्रिकेटर रोहित शर्माच्या लग्नसमारंभातील काही व्हिडिओ नुकतेच व्हायरल झाले आहेत. त्यापैकी एका व्हिडिओत विराट पंजाबी गाण्यावर डान्स करताना दिसतो. तर दुस-या व्हिडिओत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि विराटने ‘साडी की फॉल सा’ या गाण्यावर ठुमका लावल्याचे पाहावयास मिळते.