मध्य प्रदेशमधील उज्जैन येथे मंगळवारी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि त्याची पत्नी तसेच अभिनेत्री आलिया भट्ट यांचा रस्ता अडवला. रणबीर आणि आलिया यांना महाकाल मंदिरामध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केला. बीफ खाण्यासंदर्भात रणबीर कपूरने यापूर्वी केलेल्या विधानांच्या पार्श्वभूमीवर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना या दोघांचा रस्ता अढवला. उज्जैनमधील आंदोलकांवर पोलिसांनी कारवाई केल्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक प्रकाश मिश्रा यांनी आंदोलनकर्ते पोलिसांशी वाद घालून लागल्याने कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलीस काय म्हणाले?
“काही व्हीआयपी लोक मंदिरामध्ये येणार असल्याने आम्ही सुरक्षा व्यवस्था तैनात करत होतो. त्याचवेळी काही लोकांनी मंदिराला भेट देणाऱ्या या सेलिब्रिटींविरोधात आंदोलन करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी एकजण पोलीस अधिकाऱ्याशी हुज्जत घालू लागला,” असं मिश्रा यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं.

व्हायरल व्हिडीओत काय?
व्हायरल व्हिडीओमध्ये बजरंग दलाचे कार्यकर्ते शांततापूर्ण आंदोलन करत रणबीर आणि आलियाला काळे झेंडे दाखवताना दिसत आहे. मात्र पोलिसांनी या लोकांविरोधात कारवाई सुरु केली. “आम्ही रणबीरविरोधात आंदोलन करत आहोत आणि त्याला आम्ही महाकाल मंदिरात प्रवेस करुन देणार नाही. त्याने आमच्या गोमातेविरोधात विधान केलं आहे. बिफ खाणं योग्य असल्याचं तो म्हणाला आहे,” असं आंदोलकांपैकी एकजण सांगताना दिसत आहे.

गुन्हा दाखल
बजरंग दलाचे कार्यकर्ते ‘जय श्री राम’च्या घोषणा देत होते. आलिया आणि रणबीर दर्शनासाठी आल्यानंतर घोषणांचा आवाज वाढल्याचं पीटीआयने दिलेल्या वृत्तात म्हटलंय. या प्रकरणामध्ये पोलिसांनी कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल केला. सरकारी कर्मचाऱ्याच्या कामामध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्यन मुखर्जीने घेतलं दर्शन
रणबीर आणि आलिया हे त्यांच्या ‘ब्रम्हास्त्र’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये फिरत आहेत. दिग्दर्शक आर्यन मुखर्जीने महाकाल मंदिरामध्ये देवाचं दर्शन घेतल्याची माहिती येथील पुराजी आशिष पुजारी यांनी पीटीआयशी बोलताना दिली.

रणबीर काय म्हणाला होता?
२०११ मध्ये रणबरीने रॉकस्टार चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी आपल्याला बीफ खायला आवडतं असं म्हटलं होतं. “माझं कुटुंब पेशावरचं आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत पेशावरी खाद्यसंस्कृतीही इथे आली आहे. मी मटण, पायाही खातो. मी बीफचा चाहता आहे. मी बीफचा मोठा चाहता आहे,” असं रणबीर म्हणाला होता. ब्रमास्त्र चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर हा जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video ranbir kapoor alia stopped by bajrang dal activists from entering ujjain temple scsg
First published on: 07-09-2022 at 10:13 IST