सतत वगळ्या धाटणीच्या भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकणे आता विद्याच्या अंगवळीच पडले आहे असे दिसते. राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री विद्या बालन ‘पा’ चित्रपटात एका प्रेमळ आईच्या भूमिकेत दिसली होती, डर्टी पिक्चरमध्ये अपयशी अभिनेत्रीच्या भूमिकेत, तर कहानी मध्ये तर चक्क गरोदर बाई तिने प़डद्यावर साकारली होती. आता पुन्हा एकदा ती आपल्याला एक वेगळी भूमिका साकारून आश्चर्याचा धक्का देणार आहे.
लवकरच प्रदर्शित होणा-या एका विनोदी-थ्रीलर चित्रपटात भडक मेक-अप केलेल्या पंजाबी कुडीच्या भूमिकेत दिसणार आहे.
साडिला स्टाईल स्टेटमेंट बनवणारी विद्या या चित्रपटात मात्र सलवार कमीज मध्ये दिसणार आहे.
चित्रपट समीक्षमक तरण आदर्श याने आपल्या टि्वटर अकाऊंटवरून विद्याचा चित्रपटातील फोटो टि्वट करताना म्हटले आहे कि, ‘राजकुमार गुप्ताच्या तिरसट विनोदी चित्रपटातील विद्याची ही छबी.’
या चित्रपटात विद्याचे पेहराव सुबर्ना राय चौधरी यांनी डिझाइन केले आहेत.
विद्या आणि अमरान यांच्या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाल्यानंतर हा फोटो सर्वांसमोर आला आहे.
विद्या आणि इमरान यांनी डर्टी पिक्चरमध्ये एकत्र काम केले होते. ‘घनचक्कर’ मध्ये हे दोघे नवविवाहीत जोडप्याची भूमिका साकारत असून हा चित्रपट २८ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 25th Mar 2013 रोजी प्रकाशित
‘घनचक्कर’मध्ये विद्या बालन दिसणार ‘पंजाबी कुडी’च्या भूमिकेत
लवकरच प्रदर्शित होणा-या एका विनोदी-थ्रीलर चित्रपटात भडक मेक-अप केलेल्या पंजाबी कुडीच्या भूमिकेत दिसणार आहे. साडिला स्टाईल स्टेटमेंट बनवणारी विद्या या चित्रपटात मात्र सलवार कमीज मध्ये दिसणार आहे.

First published on: 25-03-2013 at 04:21 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidya balan turns punjabi kudi for ghanchakkar