बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक विक्रम भट्ट चित्रपट आणि खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा विक्रम भट्ट चर्चेत आले आहेत. यावेळी ते त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. विक्रम यांनी दुसऱ्यांदा लग्न केल्याची बातमी समोर आली आहे.

‘ई टाईम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, श्वेतांबरी सोनी असं विक्रम यांच्या पत्नीचे नाव आहे. एवढंच नाही तर त्यांच्या लग्नाला एक वर्षापेक्षा जास्त वेळ झाला आहे. मात्र, त्यांनी त्यांच्या लग्नाविषयी कोणाला सांगितले नाही. विक्रम यांनी श्वेतांबरीच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या पोस्टवरून हे समोर आल्याचे म्हटले जाते. विक्रम यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. विक्रम यांनी श्वेतांबरीच्या वाढदिवसानिमित्त एक फोटो शेअर केला होता.

आणखी वाचा : NCB च्या कोठडीत असणाऱ्या आर्यनसाठी McD चे बर्गर घेऊन पोहोचली गौरी खान पण…

आणखी वाचा : “उमेश माझा जुनाच गडी पण…”; लग्नाच्या दहाव्या वाढदिवसानिमित्त प्रियाचा खास उखाणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या आधी विक्रम भट्ट यांनी अदिती भट्टशी लग्न केले होते. त्यांना एक मुलगी असून कृष्णा भट्ट असे तिचे नाव आहे. १९९८ मध्ये विक्रम आणि अदिती यांचा घटस्फोट झाला. यानंतर विक्रम यांचे नाव सुष्मिता सेन आणि अमिषा पटेल यांच्याशी जोडण्यात आले होते.