‘नशीबवान’ या चित्रपटानंतर कल्पराज क्रिएशन प्रस्तुत, डॉ. रणजीत सत्रे आणि डॉ. प्रसन्न देवचके निर्मित आणि संजय पाटील दिग्दर्शित ‘व्हीआयपी गाढव’ या चित्रपटात अभिनेते भाऊ  कदम मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच समाजमाध्यमांवर प्रदर्शित झाले आहे.

ग्रामीण बाज, ठसकेबाज भाषा आणि दादा कोंडके शैली या तिघांचा मेळ असलेला ‘व्हीआयपी गाढव’ चित्रपट म्हणजे विनोदाची धमाल असणार आहे. चित्रपटाची कथा डॉ. रणजीत सत्रे यांची तर पटकथा डॉ. प्रसन्न देवचके यांची आहे. चित्रपटात चार गाणी असून चित्रपटाचे संगीत अशोक वायंगणकर यांचे तर गीतरचना मोमीन कवठेकर यांची आहे.

चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण अहमदनगर जिल्ह्यातील छोटय़ा गावांमध्ये झाले आहे. चित्रपटाचे नावच विनोदी असून चित्रपटात शीतल अहिरराव, भारत गणेशपुरे, विजय पाटकर, पूजा कासेकर, शरद जाधव, शिल्पी अवस्थी हे अन्य कलाकार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.