क्रिकेट आणि अभिनय क्षेत्रातील दोन दमदार व्यक्तिमत्त्व जेव्हा एका मंचावर येतात तेव्हा प्रेक्षकांसाठी ती पर्वणीच ठरते. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यांनी त्यांच्या चाहत्यांना एक दिवाळी भेट दिली. छोट्या पडद्यावरील एका चॅट शोसाठी विराट आणि आमिरने स्क्रिन शेअर केली. अपारशक्ती खुरानाने सूत्रसंचालन केलेल्या या शोचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. त्यापैकीच विराट आणि आमिर भांगडा करतानाचा एक व्हिडिओ सर्वांचंच लक्ष वेधतोय.
आगामी ‘सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असलेल्या आमिरने एक दिवसाचा वेळ काढत मुंबईत चॅट शोचं शूटिंग पूर्ण केलं. विराटने त्याच्या जीवनातील बरेच किस्से आणि काही महत्त्वपूर्ण गोष्टी चाहत्यांसोबत शेअर केले. त्यासोबतच त्याने आमिरला भांगडा हा पंजाबी नृत्यप्रकारही शिकवला. सलमान खानच्या ‘ढिंक चिका’ या गाण्यावरही हे दोघे थिरकले.
Cricketer Virat Kohli actor Aamir Khan shaking legs Dhinka Chika together. pic.twitter.com/yD3CVPJSsU
— NANDAN PRATIM
PHOTO : निशासोबत सनीची ‘हॅलोविन पार्टी’
या चॅट शोमध्ये विराटने त्याची कथित गर्लफ्रेंड अनुष्का शर्माविषयी बऱ्याच गोष्टी चाहत्यांना सांगितल्या. अनुष्काचं टोपणनाव, तिची कोणती गोष्ट सर्वांत जास्त आवडते हे विराटने मनमोकळेपणाने सांगितलं. या कार्यक्रमात विराटने अनुष्काशिवाय क्रिकेटविषयी देखील मनमुराद गप्पा मारल्या.