#Vishwaroop2Trailer : ‘मुसलमान होना गुनाह नहीं है, लेकीन..’

१० ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Vishwaroopam 2
'विश्वरुपम २'चा ट्रेलर लाँच

बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर कमल हसन यांच्या ‘विश्वरुपम २’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. पहिल्या भागाप्रमाणेच दुसऱ्या भागाच्या शूटिंगदरम्यान आणि ट्रेलर प्रदर्शनादरम्यान बऱ्याच अडचणी आल्या. पण हा अॅक्शन आणि थराराने परिपूर्ण असा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आमिर खानने हिंदी ट्रेलर लाँच केला असून कमल हसन यांची मुलगी श्रुती हसन आणि ज्युनिअर एनटीआरने तामिळ आणि तेलुगू ट्रेलर लाँच केला.

जवळपास दोन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत कमल हसन यांचीच छाप पाहायला मिळते. तर राहुल बोस, वहिदा रेहमान, पूजा कुमार आणि शेखर कपूर यांच्याही भूमिका पाहायला मिळत आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येच चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली होती आणि त्यानंतर काही अडचणींचा सामना कमल हसन यांना करावा लागला होता.

‘विश्वरुपम’ हा चित्रपटसुद्धा वादग्रस्त ठरला होता. हसन यांनी कोट्यवधी रुपये या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये गुंतवले होते. हसन यांनी मेजर विसाम अहमद काश्मिरीची मुख्य भूमिका साकारलेल्या ‘विश्वरुपम’वर मद्रास हायकोर्टाने तामिळनाडूमध्ये बंदी घातली होती. दोन आठवडयांच्या विलंबानंतर ‘विश्वरुपम’ सर्व समस्यांतून बाहेर पडून प्रदर्शित झाला होता.

वाचा : श्रीदेवीच्या सावलीला बॉलिवूडमध्ये असं मिळालं ‘ग्रँड वेलकम’

२०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘विश्वरूपम’चा हा दुसरा भाग आहे. हसन यांनी यामध्ये गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. १० ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Vishwaroopam 2 trailer released kamal haasan promises a thrilling ride

ताज्या बातम्या