बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. नुकतंच या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसचे कलेक्शन समोर आले आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी नुकतंच ट्विटरवर याबाबतची माहिती शेअर केली आहे. तरण आदर्श यांनी या चित्रपटाच्या दोन दिवसाच्या कमाईची माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी म्हणजेच ११ मार्चला शुक्रवारी ३.५५ कोटी रुपयांची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी शनिवारी ८.५० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

यानुसार ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाने आतापर्यंत १२.५ कोटींची कमाई केली आहे. दरम्यान येत्या काही दिवसात या चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान या चित्रपटाची अनेक समीक्षकांनी स्तुती केली आहे.

‘द काश्मीर फाईल्स’ पाहिल्यावर कंगनाने पुन्हा साधला बॉलिवूडवर निशाणा, म्हणाली “…त्यांची वेळ आता संपली”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्चला प्रदर्शित झाला. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी आणि चिन्मय मांडलेकर यांसारख्या प्रसिद्ध कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत.