भारतीय कसोटीसंघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी उत्तराखंड गाठले आहे. अनुष्काचे आजोळ देहरादून येथे आहे. नेशविला रोड येथे तिच्या आजीचे घर आहे. तिचे उत्तराखंडवर असलेले प्रेम अनेकदा सोशल मिडीया आणि मुलाखतींच्या माध्यमातून समोर आले आहे. इतकेच नव्हे तर सुट्ट्यांसाठी विराटला आनंदा नेण्याची कल्पनाही अनुष्काचीच असल्याचे म्हटले जातेय. दरम्यान अनुष्काने डेहराडूनमध्ये दाखल होताच आनंदाचे क्षण सोशल मीडियावरुन चाहत्यांपर्यंत पोहचविण्यास सुरुवात केली आहे. नुकताच तिने एक व्हिडिओ सोशल मीडियाच्यामाध्यमातून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती मोराला भरविताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये मोराला भरविणाऱ्या अनुष्काच्या हातामध्ये एक व्यक्ती अनुष्काच्या हातात मोरासाठीचे खाद्य देतानाही दिसत आहे. पण ती व्यक्ती नक्की कोण आहे याची ओळख मात्र व्हिडिओत होत दिसत नाही. सुटाबुटात असणारी ही व्यक्ती विराट कोहली देखील असू शकते? सोशल मीडियावर सक्रिय असणारी अनुष्का व्हिडिओतील व्यक्तिबद्दल खुलासा करणार का? हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विराट आणि अनुष्का  उत्तराखंडमध्ये पोहचल्यानंतर दोघांचेही उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरिश रावत यांनी ट्विटरवरुन स्वागत केले होते.  विमानतळावरून विराट आणि अनुष्का गाडीने हृषिकेशच्या दिशेने गेले. हे दोघेही हृषिकेशपासून १२ किमी अंतरावर असलेल्या नरेंद्रनगर येथील आनंदा हॉटेल येथे थांबल्याचे वृत्त लाइव्ह हिंदुस्तान या संकेतस्थळाने दिले होते. आनंदा हे पंचातारांकित हॉटेल असून ते स्पा आणि मेडिटेशनसाठी प्रसिद्ध आहे. पुढचे काही दिवस विराट-अनुष्का येथेच राहणार असल्याचे समजते. मात्र, हे दोघेही नववर्षाचे स्वागत येथेच करणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, आनंदा हॉटेलमध्ये त्यांच्यासाठी शनिवारी रात्री ख्रिसमस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

यापूर्वी क्रिकेटर युवराज आणि अभिनेत्री हेजल यांच्या लग्नात विराट आणि अनुष्का एकत्र दिसले होते. युवी-हेजलच्या गोव्यात झालेल्या लग्नाला विराटने अनुष्कासह उपस्थिती लावली होती. अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेपटू विराट कोहली यांच्या नात्याबद्दल आता अनेकांनाच ठाऊक आहे. विविध कार्यक्रमांनासुद्धा अनुष्का आणि विराट अनेकदा जोडीने हजेरी लावत असतात.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch anushka sharma shares video from dehradun
First published on: 28-12-2016 at 22:15 IST