आगामी ‘तेवर’ या चित्रपटाचा पहिला ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. सोनाक्षी सिन्हा, मनोज बाजपेयी, अर्जुन कपूर यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.
मनोज वाजपेयीपासून ट्रेलरला सुरुवात होते. भरपूर वर्षांनंतर मनोज खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘आग्रा का लौंडा’ म्हणजेच अर्जुन कपूरची तडाकेबाज इन्ट्री यात पाहावयास मिळते. त्याने चित्रपटात कबड्डीपट्टूची भूमिका साकारली आहे. यात राधिकाच्या भूमिकेत असलेली सोनाक्षीही सोज्वळ रुपात दिसते. ‘तेलगू’ चित्रपट ‘ओक्कडू’ चा रिमेक असलेल्या ‘तेवर’चे दिग्दर्शन अमित शर्माने केले आहे. बॉनी आणि संजय कपूर यांची निर्मिती असलेला ‘तेवर’ पुढील वर्षी जानेवारीत प्रदर्शित होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch arjun kapoor sonakshi sinha manoj bajpyee are terrific in tevar trailer
First published on: 11-11-2014 at 01:37 IST