आगामी ‘राम लीला’ चित्रपटातील रणवीर सिंगच्या ‘तत्तड तत्तड (रामजी की चाल)’ गाण्याच्या प्रदर्शनानंतर आता दीपिकावर चित्रीत केलेले गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘नगाडा संग ढोल’ असे गाण्याचे बोल असून हे गाणे ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटातील ‘ढोल बाजे’ या गाण्याची आठवण करून देते. मात्र, ढोल बाजे गाण्यात सलमान-ऐश्वर्याचा पहावयास मिळालेला रोमान्स दीपिका-रणवीरच्या या गाण्यात पहायला मिळत नाही. या गाण्यात रोमान्सऐवजी तणावपूर्ण परिस्थिती बघावयास मिळते.
श्रेया घोशाल आणि ओस्मान मिर यांनी गायलेल्या ‘नगाडा संग ढोल’ या गाण्यास खुद्द संजय लीला भन्सालीने संगीत दिले आहे. ‘राम लीला’ १५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Oct 2013 रोजी प्रकाशित
पहाः दीपिकाचे ‘नगाडा संग ढोल’ गाणे
आगामी 'राम लीला' चित्रपटातील रणवीर सिंगच्या 'तत्तड तत्तड (रामजी की चाल)' गाण्याच्या प्रदर्शनानंतर आता दीपिकावर चित्रीत केलेले गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे.
First published on: 01-10-2013 at 04:22 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch deepika padukones flawless garba in nagada sang dhol in ram leela