अभिनेता शाहिद कपूरची रॉकस्टार भूमिका असलेला ‘उडता पंजाब’ या आगामी चित्रपटाचे शिर्षक गीत प्रदर्शित झाले आहे. गाण्यात शाहिद आपल्या रॉकस्टार अंदाजात पार्टी करताना दिसतो. गायक विशाल दादलानि आणि अमित त्रिवेदी यांनी हे गाणे गायले असून, बॉक्सो मार्टिस याने नृत्य दिग्दर्शन केले आहे. गाणे प्रदर्शित करण्याच्या पूर्वसंध्येला शाहिदचा या गाण्यातील रॉकस्टार लूकचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतर शाहिदचे चाहते या चित्रपटाचे संपूर्ण शिर्षक गीत प्रदर्शित होण्याची वाट पाहत होते. गाण्यातील ‘उडता पंजाब’ हे शब्द लक्षवेधणारे असून, हे एक पेपी साँग आहे.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Jun 2016 रोजी प्रकाशित
VIDEO: शाहिदच्या ‘उडता पंबाज’चे शिर्षक गीत प्रदर्शित
गाण्यात शाहिद आपल्या रॉकस्टार अंदाजात पार्टी करताना दिसतो
Written by लोकसत्ता टीमविश्वनाथ गरुड

First published on: 03-06-2016 at 18:53 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch shahid kapoor starrer udta punjabs title track ud daa punjab is catchy