सोनम कपूर आणि आयुषमान खुराना यांचा अभिनय असलेल्या ‘बेवकुफियां’ चित्रपटातील या आधी प्रसारित झालेल्या ‘गुलछरे’ या गाण्यात आयुषमानचे नृत्यकौशल्य पाहायला मिळाले. आता चित्रपटकर्त्यांकडून प्रसारित करण्यात आलेल्या ‘खामखां’ या रॉमेन्टिक गाण्याच्या व्हिडिओमध्ये सोनम कपूरचे नृत्य कौशल्य दिसणार आहे. यश राज फिल्म्सने ‘बेवकुफियां’ या आपल्या विनोदी प्रेमपटातील ‘खामखां’ हे दुसरे गाणे प्रसारित केले आहे. या सुमधूर गाण्याची सुरूवात सोनम कपूरच्या नृत्यापासून होते, जी आपल्या प्रियकराला मनवण्याच्या प्रयत्नात आहे. चित्रपटात सोनम मेयेराची तर आयुषमान मोहितची व्यक्तिरेखा साकारत आहेत. या गाण्यात हे रॉमेन्टिक युगुल रात्रीच्या वेळी निर्जन रस्तावर संगीताच्या तालावर नृत्य करताना दिसते. शिमरी स्ट्रिपलेस पोषाखातली सोनम फारच छान दिसते, तर लेदर जॅकेट, टी-शर्ट आणि डेनिम परिधान केलेला आयुषमान एकदम कूल-डूड दिसतो. निर्जन रस्त्यावर नृत्य करणारी ही जोडी नंतर एका बसमध्ये देखील नाचताना दिसते. यानंतर, घरी पोहोचल्यावर त्यांच्यातील पुढचा रोमान्स सुरू होताना दिसतो. नुपुर अस्थाना दिग्दर्शित हा चित्रपट एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडालेल्या महत्वाकांक्षी जोडीची कथा आहे. १४ मार्चला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात ऋषी कपूर सोनमच्या वडिलांची भूमिका साकारत आहे.
पाहा गाण्याचा व्हिडिओ:

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch sonam ayushmann get romantic in khamakhaan from bewakoofiyaan
First published on: 19-02-2014 at 06:03 IST