बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनचे साडी या पारंपारिक पोशाखावर असलेले प्रेम सर्वज्ञात आहे. विद्या केवळ भारतीय कार्यक्रमांमध्येच नाही तर आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्येही साडी नेसण्यास प्राधान्य देते. त्याचप्रमाणे भारतातील स्त्रियांनी साडीला प्राधान्य द्यावे, असे विद्याचे म्हणणे आहे.
विद्याने नुकतेचं ‘वाया’ या साड्यांच्या कलेक्शनचे अनावरण केले. गौरांग शाह, बाप्पादित्य आणि मीरा सागर या डिझाइनर्सनी ‘वाया’ हा ब्रॅण्ड सुरु केला आहे. आधुनिक सौंदर्यशास्त्र आणि पारंपारिकता या दोन गोष्टींची योग्य जोडणी करुन तयार करण्यात आलेल्या या साड्यांची विद्याने प्रशंसा केली. ती म्हणाली की, ‘वाया’ ब्रँण्डअंतर्गत तयार केलेल्या साड्या महिलांना साडी नेसण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या आहेत. जेणेकरून, केवळ ठराविक कार्यक्रमाला साडी न नेसता इतरवेळीही महिला साडीला प्राधान्य देतील. कोणत्याही वयोगटातील महिलांवर या साड्या खुलून दिसतील हाच विचार लक्षात घेऊन या साड्या डिझाइन करण्यात आलेल्या आहेत.
मुंबईतील कुमारास्वामी हॉल येथे या साड्यांचे प्रदर्शन सुरु आहे.
संग्रहित लेख, दिनांक 19th Feb 2016 रोजी प्रकाशित
विद्या बालन म्हणते, महिलांनी साडीच नेसावी
ठराविक कार्यक्रमाला साडी न नेसता इतरवेळीही महिला साडीला प्राधान्य देतील.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
Updated:

First published on: 19-02-2016 at 12:51 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wear saris beyond special occasions urges vidya balan