बॉलिवूडमध्ये नायक म्हणून कारकिर्द घडवणं एकवेळ सोप्पं असेल पण, ती टिकवणं हे फार अवघड होऊन बसतं. ‘धूम’ चित्रपटात जॉन अब्राहम खलनायक म्हणून समोर आला होता. पण, ‘धूम’ला मिळालेले अमाप यश जॉनच्या पथ्यावर पडलं आणि त्याची बॉलिवूडमध्ये ‘हिरो’ म्हणून कारकिर्द धावायला लागली. पण, जितक्या वेगाने जॉन अब्राहमला चित्रपट मिळाले तितक्याच वेगाने त्याची कारकिर्द खालीही आली. तरीही मुळातच संयमी असलेल्या जॉनने आपला ट्रॅक बदलत कधी निर्माता, कधी अभिनेता आणि तेही वेगवेगळ्या शैलीतले चित्रपट आणि भूमिका यांचा समतोल राखत आपली कारकिर्द सांभाळली. सध्या यशस्वी निर्माता असलेला जॉन ‘मद्रास कॅ फे’ नंतर दोन वर्षांंनी अभिनेता म्हणून ‘वेलकम बॅक’ चित्रपटात दिसणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बॉलीवूडमध्ये नायक म्हणून कारकीर्द घडवणं एक वेळ सोप्पं असेल पण, ती टिकवणं हे फार अवघड होऊन बसतं. ‘धूम’ चित्रपटात जॉन अब्राहम खलनायक म्हणून समोर आला होता. पण, ‘धूम’ला मिळालेले अमाप यश जॉनच्या पथ्यावर पडलं आणि त्याची बॉलीवूडमध्ये ‘हिरो’ म्हणून कारकीर्द धावायला लागली, पण जितक्या वेगाने जॉन अब्राहमला चित्रपट मिळाले तितक्याच वेगाने त्याची कारकीर्द खालीही आली. तरीही मुळातच संयमी असलेल्या जॉनने आपला ट्रॅक बदलत कधी निर्माता, कधी अभिनेता आणि तेही वेगवेगळ्या शैलीतले चित्रपट आणि भूमिका यांचा समतोल राखत आपली कारकीर्द सांभाळली. सध्या यशस्वी निर्माता असलेला जॉन ‘मद्रास कॅ फे’ नंतर दोन वर्षांनी अभिनेता म्हणून ‘वेलकम बॅक’ चित्रपटात दिसणार आहे.
अ‍ॅक्शन हिरोच्या भूमिका लोकांना जास्त आवडतात. लोकांना आपल्या चित्रपटांमधून रडवणंही एक वेळ सोप्पं असतं. पण, विनोदी भूमिका करणं, लोकांना हसवणं हे फार अवघड असतं, हे आपण आजवरच्या अनुभवातून शिकलो आहोत, असे जॉनचे म्हणणे आहे. त्यामुळे ‘वेलकम बॅक’ सारख्या चित्रपटातून जेव्हा प्रेमात पडून सुधारू पाहणाऱ्या गुंडाची विनोदी व्यक्तिरेखा साकारायला मिळाली तेव्हाच ही संधी हातची जाऊ द्यायची नाही, असं ठरवल्याचं जॉनने सांगितलं. अनिस बाज्मी दिग्दर्शित ‘वेलकम बॅक’ या सिक्वलमध्ये मूळ चित्रपटातील तीन दिग्गज चेहरे कायम आहेत. परेश रावल, नाना पाटेकर आणि अनिल कपूर ही ‘वेलकम’ची गाजलेली तिकडी सिक्वलमध्येही दिसणार आहे. पण, अक्षय कुमारची जागा आता जॉनने घेतली आहे तर ‘आरडीएक्स’च्या भूमिकेत फिरोझ खान होते त्याऐवजी नसीरुद्दीन शहा दिसणार आहेत.

अक्षयकुमारची व्यक्तिरेखा मागच्याच चित्रपटात पूर्ण झाली होती. सिक्वलची कथा ही अज्जू या व्यक्तिरेखेभोवती फिरते, असे जॉन सांगतो. अज्जू हा गुंड प्रेमात पडला आहे. त्यामुळे त्याला आता गुंडगिरी सोडून सरळमार्गी जीवन जगायचं आहे. म्हणून तो एके काळी ‘डॉन’ असलेल्या आणि आता सुधारित आवृत्ती म्हणून जगणाऱ्या उदय (नाना पाटेकर) आणि ‘मजनू’ (अनिल क पूर) भाई यांची मदत हवी आहे. या दोघांचा अनुभव आपल्या कामी येईल, या विचाराने अज्जू त्या दोघांनाही आपल्याबरोबर घेतो, अशी या चित्रपटाची कथा असल्याचे जॉनने सांगितले. आपण याआधाही विनोदी चित्रपटांमधून काम केले आहे. ‘देसी बॉइज’, ‘गरम मसाला’, ‘हाऊसफुल्ल २’ सारख्या विनोदी चित्रपटांमधून मी काम केलं आहे. विनोदी भूमिकांची तुम्हाला एकदा सवय लागली की त्या तुम्हाला करायला आवडतात. माझंही तसंच झालं होतं. पण, ‘वेलकम बॅक’मध्ये केवळ माझी एकटय़ाची विनोदी भूमिका नाही. माझ्याबरोबर नाना, अनिल, परेश आणि नसीरुद्दीन शहा यांच्यासारखे दिग्गज कलाकार आहेत आणि अशा कलाकारांबरोबर काम करताना अभिनेता म्हणून तुमचा दर्जा वाढतच जातो. त्यामुळे ‘वेलकम बॅक’ हा चित्रपट एका अर्थाने महत्वाचा वाटतो, असे तो म्हणतो.
‘वेलकम बॅक’ आणि ‘हेराफेरी ३’ या दोन्ही चित्रपटांत अक्षयकुमारच्या जागी जॉनची वर्णी लागली आहे. पण, त्यामुळे अक्षय आणि आपल्या नात्यात काही फरक पडला नसल्याचे त्याने सांगितले. या दोन्ही चित्रपटांबद्दल अक्षयकुमारशी आपले बोलणे झाले होते आणि त्याने या चित्रपटांसाठी शुभेच्छा दिल्या असल्याचे जॉनने सांगितले. निर्माता म्हणून काही एक संदेश देणारे, अर्थपूर्ण चित्रपट लोकांसमोर आणण्याचा मानस त्याने व्यक्त केला. दोन वर्षांनी जॉन रुपेरी पडद्यावर दिसणार असला तरी त्याचे एकापाठोपाठ एक चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. ‘वेलकम बॅक’ नंतर ‘रॉकी हॅण्डसम’ हा त्याचा चित्रपट पुढच्या वर्षी जानेवारीत प्रदर्शित होईल. त्यानंतर ‘ढिश्यूम’, ‘फोर्स २’ असे चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होतील, अशी माहिती जॉनने दिली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Welcome back jhon abraham
First published on: 23-08-2015 at 01:40 IST