अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियन हिने सुशांतच्या काही दिवसांआधीच आत्महत्या केली होती. दिशाने इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. पण त्या रात्री नेमकं काय घडलं होतं, हे तिच्या एका मैत्रिणीने सांगितलं आहे. दिशाच्या घरी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीला दिशा, तिचा होणारा पती रोहन, आणि मित्र हिमांशू, नील व दीप हे उपस्थित होते.

‘इंडिया टुडे’ला दिशाच्या मैत्रिणीने त्या रात्री नेमकं काय घडलं होतं, याची माहिती दिली. पार्टीत सर्वांनी मद्यपान केलं होतं. मद्यपानानंतर दिशा फार भावूक झाली आणि तिची कोणाला काळजीच नाही असं वारंवार बोलत होती. त्यानंतर रात्री तिने युकेतील एका मित्राला फोन केला. फोनवर ती रडू लागली होती. त्याच्याशी फोनवर बोलत असतानाच दिशा दुसऱ्या रुममध्ये गेली आणि दरवाजा आतून बंद करून घेतला. बराच वेळ झाल्यामुळे दिशाच्या मित्रांनी मिळून दरवाजा तोडला. पण रुममध्ये दिशा कुठेच नव्हती. जेव्हा हिमांशू आणि दीपने खिडकीतून खाली पाहिलं तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. सर्वजण खाली धावत गेले पण तोपर्यंत दिशाचा मृत्यू झाला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिशाने आत्महत्या केल्यानंतर काही दिवसांनी सुशांतने मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दिशा आणि सुशांतच्या आत्महत्येचं काही कनेक्शन आहे का, असेही प्रश्न चाहत्यांनी सोशल मीडियावर उपस्थित केले.