बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. गेल्या काही दिवसांपासून शिल्पा तिचा पती राज कुंद्रामुळे चर्चेत होती. राज कुंद्राला पॉर्न अॅप प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्याला सुटका मिळाल्यापासून तो आणि शिल्पा कुठेच एकत्र दिसले नाही आहेत. दरम्यान, शिल्पाचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यात अभिनेते अनिल कपूर तिला राज कुंद्राशी का लग्न केलसं असा प्रश्न विचारताना दिसत आहे.

शिल्पाचा हा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ बॉलिवूडची लोकप्रिय निर्माती फराह खानच्या ‘बॅकबेन्चर्स’ या शोमधला आहे. २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या या एपिसोडमध्ये अनिल कपूर आणि शिल्पाने हजेरी लावली होती. यात फराह विचारते, ‘शिल्पा राजने शिट्टी वाजवली, पंख पसरवले की अजुन काय केल? की तू लग्नासाठी हा म्हणालीस? त्यावर अनिल म्हणाले, ‘पैसे टाकले.’ हे ऐकताच शिल्पा हसू लागते आणि बोलते ‘पैशांशिवाय हातही पसरवले होते.’ त्यावर अनिल म्हणतात ,’ त्या हातांमध्ये पैसे तर होतेच ना…’

आणखी वाचा : “पहिल्याच डेटवर बॉयफ्रेंडने केली शरीरसुखाची मागणी…”, ‘तारक मेहता…’ मालिकेतील अभिनेत्रीने केला खुलासा

आणखी वाचा : दयाबेन आहे कोट्यावधींच्या संपत्तीची मालकीन, ‘तारक मेहता…’च्या एका एपिसोडसाठी घ्यायची इतके मानधन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या आधी शिल्पाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. हा व्हिडीओत कपिल शर्माच्या शोमध्ये शिल्पाने पती राज कुंद्रा आणि बहिण शमिता शेट्टीसोबत हजेरी लावली होती. यावेळी कपिल राजला विचारतो की ‘ राज नेहमी आम्ही पाहतो की तुम्ही शिल्पाला कधी शॉपिंगला घेऊन जातात..कधी क्रिकेट मॅच पाहण्यासाठी वगैरे…मग तुम्ही काम न करता पैसे कसे कमवतात.’ हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.