अभिनेत्री सुष्मिता सेन ही तिच्या बॉलिवूड करिअरसोबतच खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी सुष्मिताचा बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत ब्रेकअप झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा ती तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली आहे. आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांनी सोशल मीडियावर सुष्मिता सेनसोबतच्या नात्याची कबुली दिल्यानंतर या दोघांच्या नात्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. ललित मोदींच्या या घोषणेनंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. यानंतर त्या दोघांबद्दल विविध गोष्टी समोर येत आहेत.

ललित मोदी आणि सुष्मिता सेन बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची घट्ट मैत्री आहे. ते अनेकदा सोशल मीडियावर विविध फोटो व्हिडीओ शेअर करताना दिसतात. विशेष म्हणजे अनेकदा ते दोघे एकमेकांसाठीही पोस्ट शेअर करतात. विशेष म्हणजे ललित मोदी यांनी सुष्मिता सेनला तिचे ट्विटर व्हेरिफाय करुन देण्यासाठी मदतही केली होती. नुकतंच एका जुन्या पोस्टमधून ही माहिती समोर आली आहे.

“मी ललित मोदीला जावई म्हणून…”, सुष्मिता सेनच्या रिलेशनशिपवर वडिलांची पहिली प्रतिक्रिया

सुष्मिता सेन ही ट्विटरवर कायमच सक्रीय असते. सुष्मिताने २०११ मध्ये एक ट्विट करत ललित मोदी यांचे आभार मानले होते. “अखेर माझे ट्विटर अकाऊंट व्हेरिफाईड झाले. ललित मोदीजी तुमच्या मदतीसाठी खूप खूप धन्यवाद. या ब्लू टिक मार्कसाठी तुमचे आभार. ही पार्टीची वेळ आहे”, असे ट्विट सुष्मिता सेनने केले होते.

विशेष म्हणजे ललित मोदी यांनी २०१३ साली सुष्मिता सेनला टॅग करून एक ट्वीट केलं होतं. यात ट्वीटला सुष्मिता सेननं उत्तरही दिलं होतं. ललित मोदी यांनी ९ वर्षांपूर्वीच आपल्या एका ट्वीटमध्ये सुष्मिता सेनला टॅग करून “माझ्या मेसेजचं उत्तर दे” असं म्हटलं होतं. सध्या त्यांचे हे काही ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या ट्विटवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.

सुष्मिता सेन आणि ललित मोदींच्या रिलेशनशिपवर एक्स बॉयफ्रेंडची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ललित मोदी यांनी सुश्मितासोबतचे काही फोटो शेअर करत एक ट्वीट केलं होतं. त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं होतं, “कुटुंबासोबत मालदीव, सार्दानियाच्या दौऱ्यावरुन नुकताच लंडनला परतलो. यावेळी माझी ‘बेटर हाफ’ सुश्मिता सेनही सोबत होती. अखेर नवी सुरुवात आणि नवं आयुष्य सुरू झालं आहे. माझ्या आनंदाला पारावार उरलेला नाही.” त्यांच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर सुष्मिताच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू झाली होती मात्र त्यानंतर ललित मोदी यांनी आणखी एक ट्वीट करत या चर्चांना पूर्णविराम दिला. ज्यात त्यांनी, “अद्याप अद्याप आमचं लग्न झालेलं नाही तर फक्त एकमेकांना डेट करत आहोत” असं म्हटलं आहे.