‘ती बेडवर माझी वाट पाहत होती…’, महेश भट्ट यांनी परवीन बाबी विषयी केला होता खुलासा

महेश आणि परवीन यांची लव्ह स्टोरी ही बॉलिवूडमधील वादग्रस्त लव्ह स्टोरींपैकी एक आहे.

mahesh bhatt, parveen babi
महेश आणि परवीन यांची लव्ह स्टोरी ही बॉलिवूडमधील वादग्रस्त लव्ह स्टोरींपैकी एक आहे.

बॉलिवूडमध्ये आल्याला अनेक लव्ह स्टोरी पाहायला मिळाल्या आहेत. त्यात दिग्दर्शक महेश भट्ट आणि परवीन बाबी यांची लव्ह स्टोरी तर बॉलिवूडमधील वादग्रस्त लव्ह स्टोरींपैकी एक आहे. महेश भट्ट यांनी एका मुलाखतीत त्यांच्या आणि परवीन बाबीच्या रिलेशनशिपबद्दल वक्तव्य केले होते.

रिपोर्ट्सनुसार, करिश्मा उपाध्याय यांनी परवीन बाबीच्या जीवनावर आधारीत असलेल्या पुस्तकात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. परवीन बाबी या आधी महेश भट्ट यांचा जवळचा मित्र कबीर बेदीसोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. परंतु जेव्हा त्यांच्यात वाद होऊ लागले तेव्हा ते विभक्त झाले आणि त्यावेळी महेश भट्ट यांची एण्ट्री झाली. ‘त्या रात्री आम्ही दोन मित्र म्हणून गप्पा मारत होतो. पण हळूहळू आमच्या चर्चा खोलवर होत गेल्या. त्या शांत वातावरणात आम्ही हळूहळू एकमेकांकडे आकर्षित होत गेलो’, असे परवीन बाबीने सांगितल्याचे, ‘मुंबई मिरर’मध्ये सांगण्यात आले आहे.

आणखी वाचा : अखेर आमिर आणि किरण राव यांच्या घटस्फोटाचं खरं कारण आलं समोर..

महेश भट्ट यांच्यासाठी रिलेशनशिपमध्ये येणं ही खूप मोठी गोष्ट होती. कारण, त्यांचे लग्न झाले होते आणि त्यांना एक मुलगी देखील होती. त्या पुस्तकात असे लिहिले आहे की, जेव्हा महेश भट्ट परवीन यांच्या घरून जात होते. तेव्हा त्यांनी पाहिलं की परवीन त्यांना सोडायला बाहेर आल्या नाही. परवीन त्यांना हाक मारत आहेत असे महेश यांना ऐकू आले आणि जेव्हा ते बेडरूमच्या दिशेने गेले, “ती माझी वाट पाहत बेडवर बसली होती. त्यावेळी तिथे पूर्ण शांतता होती कारण तिथे बोलण्याची काही गरज नव्हती.”

आणखी वाचा : ‘…म्हणून मला बाळाला स्तनपान करतानाचा फोटो शेअर करायची गरज वाटत नाही’ : करीना कपूर

महेश आणि परवीन यांच्या लव्ह स्टोरीचा शेवट चांगला नव्हता. रिपोर्ट्सनुसार परवीन या मानसिक आजाराने ग्रस्त होत्या आणि त्यामुळे त्यांची लव्ह लाईफ काही चांगली नव्हती. ज्यावेळी परवीन आणि महेश हे रिलेशनशिपमध्ये होते. त्यावेळी महेश भट्ट हे फ्लॉप दिग्दर्शक होते तर परवीन या टॉपच्या अभिनेत्री होत्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: When mahesh bhatt talked about how parveen babi was lying on bed wainting for him dcp