scorecardresearch

‘नाटकाचे ‘प्रयोग’ का म्हणतात?’; चाहत्याच्या प्रश्नावर प्रशांत दामलेनं दिलं भन्नाट उत्तर

नुकतंच त्यांना एका चाहत्याने नाटकाच्या प्रयोगावरुन विचारलेल्या प्रश्नावर भन्नाट उत्तर दिले आहे.

prashant damle

अभिनेते प्रशांत दामले हे लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहेत. प्रशांत दामले यांनी त्यांच्या विनोदीबुद्धीने प्रेक्षकांची मन जिंकली आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक मराठी नाटकांमध्ये काम केले आहे. त्यासोबतच ते खवय्यांसाठीचे असलेले खास कार्यक्रम नेहमीच रंगवताना दिसतात. प्रशांत दामले हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. प्रशांत दामले हे छोट्या पडद्यासह अनेक नाटक करण्यावरही भर देतात. नुकतंच त्यांना एका चाहत्याने नाटकाच्या प्रयोगावरुन विचारलेल्या प्रश्नावर भन्नाट उत्तर दिले आहे.

प्रशांत दामले हे फेसबुकवर कायमच सक्रीय असतात. ते अनेकदा त्यांच्या विविध नाटकांच्या प्रयागोच्या फोटो आणि पोस्ट शेअर करताना दिसतात. नुकतंच त्यांनी नाटकाच्या प्रयोगासंदर्भात पोस्ट शेअर केली होती. त्यावर एका चाहत्याने नाटकाचे ‘प्रयोग’ का म्हणतात? असा प्रश्न विचारला होता. यावर त्यांनी फार मस्त उत्तर दिले आहे.

‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील इंद्राची इन्स्टाग्रामवरुन एक्झिट, कारण आले समोर

‘कारण प्रत्येक नाटक हा एक Experiment (प्रयोग).., कधीही काहीही चुकू शकत किंवा कधीही काहीही नवीन काहीतरी मिळू शकत’, असे उत्तर प्रशांत दामले यांनी दिले आहे. त्यांचे हे उत्तर ऐकून अनेक चाहत्यांनी लाईक्स दिल्या आहेत.

“सतत काहीतरी नवं करण्याची इच्छा…”, अभिनेत्री प्राजक्ता माळीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

दरम्यान प्रशांत दामले हे सध्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाच्या प्रयोगात व्यस्त आहे. सध्या ते सोलापूर दौरा करताना दिसत आहे. या नाटकात मराठी रंगभूमीवरील प्रशांत दामले आणि कविता लाड-मेढेकर ही सदाबहार जोडी पाहायला मिळत आहेत. या नाटकाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली आहे. त्यासोबतच ते झी मराठीवरील किचन कल्लाकार या शोद्वारेही प्रेक्षकांच्या भेटीला येतात.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Why is the drama play called prayog actor prashant damle answer to a fan questions nrp

ताज्या बातम्या