काही वर्षांपूर्वी अडल्ट चित्रपटांमध्ये काम करणारी आणि पॉर्न स्टार म्हणून ओळखली जाणारी मिया खलिफा सध्या सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर म्हणून जगभरात ओळखली जाते. मियाने दोन वर्षांपूर्वी दुसरं लग्न केलं होतं, पण वर्षभरातच तिचा घटस्फोट झाला होता. तिच्या घटस्फोटाचं नेमकं कारण काय होतं? जाणून घ्या.

‘पिंकव्हिला’च्या वृत्तानुसार, मिया २१ जुलै २०२१ रोजी रॉबर्ट सँडबर्गशी लग्नाची घोषणा केली होती. लग्न टिकवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले, पण त्याचा फायदा झाला नाही, त्यामुळे आपण घटस्फोट घेतल्याचं मियाने सांगितलं होतं. मिया आणि रॉबर्ट यांनी लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला होता, त्यानंतर काही दिवसांतच मियाने एक फोटो शेअर करत घटस्फोटाबद्दल माहिती दिली होती.

Arijit Singh Love Story: वर्षभरात घटस्फोट, एका मुलाची आई असलेल्या मैत्रिणीशी दुसरं लग्न अन्… जाणून घ्या अरिजीतच्या पत्नीबद्दल

पतीपासून विभक्त झाल्याची घोषणा करताना मिया खलिफाने लिहिले होते की, “आम्ही आत्मविश्वासाने सांगू शकतो की आमचे लग्न टिकवण्यासाठी सर्व काही केले, पण जवळपास वर्षभर प्रयत्न केल्यानंतर आम्ही वेगळे होत आहोत. आम्ही चांगले मित्र आहोत आणि आम्ही खरोखरच आमचे लग्न वाचवण्याचा प्रयत्न केला. आम्ही नेहमीच एकमेकांवर प्रेम करू व एकमेकांचा आदर करू, कारण आम्हाला माहीत आहे की आमच्या विभक्त होण्यामागील कारण मतभेद आहेत. त्या मतभेदांसाठी आम्ही दोघेही एकमेकांना दोष देऊ शकत नाही.”

यापूर्वी मियाचे २०११ ते २०१४ दरम्यान लग्न झाले होते, ते तीन वर्षे टिकले होते, पण तिच्या पहिल्या पतीबद्दल कोणालाही माहीत नाही. रॉबर्ट सँडबर्गने तिला मार्च २०२० मध्ये प्रपोज केले होते. नंतर दोघांनी २०२१ मध्ये लग्न केले. २८ वर्षीय रॉबर्ट व्यवसायाने शेफ असून लॉस एंजेलिसमध्ये मियाबरोबर राहत होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मियाने ‘प्यूर्टो रिकान’चा कलाकार झाय कॉर्टेझबरोबर एका युट्यूब व्हिडीओमध्ये काम केलं होतं. तेव्हापासून दोघांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू आहेत. पण अद्याप त्यांनी याबद्दल कोणतंही भाष्य केलेलं नाही.