अभिनेता हृतिक रोशन याचा आगामी चित्रपट ‘क्रिश-३`ची स्क्रिप्ट चोरीची असल्याचा आरोप मध्य प्रदेशच्या एका लेखकाने केला आहे. त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात स्वामित्व हक्कभंगाची याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
भारतीय सुपरहीरो ही संकल्पना असलेल्या ‘कोई मिल गया’ आणि ‘क्रिश` चित्रपटांना यापूर्वी चांगलेच यश मिळाले आहे. यांचाच सिक्वल असलेला ‘क्रिश ३` चित्रपट १ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची पटकथा मी लिहिली आहे. मात्र, मला निर्माता राकेश रोशन यांनी श्रेय दिलेले नाही, अशी याचिका सोमवारी मध्य प्रदेशातील उदयसिंह राजपूत या लेखकाने दाखल केली आहे. या चित्रपटाच्या स्क्रिप्टबाबत मला दोन कोटी रुपयांची भरपाई मिळावी, अशी मागणीही त्यांनी याचिकेत केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th Oct 2013 रोजी प्रकाशित
‘क्रिश ३’ विरोधात न्यायालयात याचिका
अभिनेता हृतिक रोशन याचा आगामी चित्रपट ‘क्रिश-३`ची स्क्रिप्ट चोरीची असल्याचा आरोप मध्य प्रदेशच्या एका लेखकाने केला आहे.

First published on: 29-10-2013 at 11:15 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Writer alleges copyright violation of hrithik roshan starrer krrish 3 claims rs 2 cr