‘द कपिल शर्मा शो’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी शो आहे. प्रेक्षकांना हा शो पाहायला प्रचंड आवडते. या शोमध्ये अनेक सेलिब्रिटी हजेरी लावताना दिसतात. यावेळी शोमध्ये ‘भूत पोलिस’च्या टीमने हजेरी लावली होती. नुकताच त्याचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात अभिनेता सैफ अली खान, यामी गौतम आणि जॅकलिन फर्नांडिसने हजेरी लावल्याचे दिसत आहे.

हा प्रोमो सोनी टिव्हीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. यात कपिल यामीला म्हणतो की ‘आम्ही असं ऐकलं आहे की यामी आणि आदित्यला हनीमूनला जाताना त्यांच्या कुटुंबाला सोबत घेऊन जावे अशी इच्छा होती.’ यावर उत्तर देत कपिल स्वत: म्हणाला, ‘तुम्हाला कोणी सांगितलं नाही का तिथे कुटुंबाला घेऊन जात नाही.’ तर यावर उत्तर देत यामी म्हणाली, ‘दोघांची इच्छा होती की सगळ्यांनी एकत्र गेलं पाहिजे.’ यावर हसत सैफ यामीला म्हणतो ‘खरंच’, तर यामी ‘हो’ असं उत्तर देते.

आणखी वाचा : तुझ्या घराचा रंग पावसाच्या पाण्याने उडाला म्हणणाऱ्यांना हृतिकचं भन्नाट उत्तर, म्हणाला…

आणखी वाचा : समांथा आणि नागा चैतन्य खरंच विभक्त होणार? समोर आली भविष्यवाणी

यामीने याच वर्षी ४ जून रोजी दिग्दर्शक आदित्य घरशी लग्न केले. त्यांच्या लग्नाने सगळ्या चाहत्यांना धक्काच बसला होता. यामीने स्वत: त्यांच्या लग्नातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्यांच्या लग्नात फक्त त्यांच कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित होते.