‘ये रिश्ता क्या कहलाता है’ ही मालिका गेल्या १२ वर्षांपासून स्टार प्लसवर सातत्याने सुरू आहे. प्रेक्षकांनी या मालिकेला भरभरून प्रतिसाद दिला, त्यामुळे एक दशकापेक्षा जास्त कालावधी उलटूनही ही मालिका अद्याप सुरूच आहे. सेपरेशन ट्रॅक आल्यानंतर कथेत बदल झाले आणि अनेक नव्या कलाकारांची या मालिकेत एंट्री झाली. पण मालिकेवरील प्रेक्षकांचं प्रेम मात्र कमी झालं नाही. या मालिकेत नविका कोटिया आणि मृणाल जैन या नवीन कलाकारांची वर्णी लागली.

या मालिकेत मायाची भूमिका साकारणारी नविका कोटिया सध्या रुग्णालयात आहे. तिची प्रकृती ठिक नसून गेल्या तीन दिवसांपासून ती रुग्णालयात दाखल असल्याची माहिती तिने दिली आहे. नविकाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केलाय, त्यामध्ये ती रुग्णालयाच्या बेडवर झोपलेली दिसत आहे. तर शेजारी डॉक्टर्स आणि नर्स तिच्या एमआरआयची तयारी करताना दिसत आहेत.

navika postt
नविकाने इन्स्टाग्रामवरून तिच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे.

नविका तिच्या चाहत्यांना तिच्या प्रकृतीबद्दल माहिती देत आहे. यापूर्वी तिने एक पोस्ट करत तिची मैत्रीण आणि तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत सोनूची भूमिका साकारणारी पलक सिधवानी भेटायला आल्याचं सांगितलं होतं. आपल्या कुटुंबीयांची आणि मित्र-मैत्रिणींची काळजी घेण्यासाठी नविकाने पलकचे आभार मानले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
palak navika
पलक सिधवानीने घेतली नविकाची भेट

नविका सध्या डॉ. कुणाल खेराची बहीण मायाची भूमिका या मालिकेत साकारत आहे. तिला गायिका बनायचं आहे आणि त्यासाठी कुणाल अक्षराला ब्लॅकमेल करतो, तो तिला अभिमन्यु आणि त्याच्या कुटुंबियांपासून दूर मॉरिशसला नेतो आणि कैरवचं अपहरण करतो.