scorecardresearch

स्वीटूने खरेदी केली तिची पहिली गाडी; फोटो शेअर करत म्हणाली…

अन्विताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत तिचा आनंद शेअर केला आहे.

sweety, anvita phaltankar new car,
अन्विताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत तिचा आनंद शेअर केला आहे.

छोट्या पडद्यावरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका अतिशय लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील स्वीटू आणि ओमकारच्या जोडीने प्रेक्षकांची मने जिकंली. दरम्यान, आता स्वीटूची भूमिका साकारणारी अभिनेत्री अन्विता फलटणकरने नुकतीच एक गाडी घेतली आहे. त्याचे फोटो अन्विताने सोशल मीडियावर शेअर केले होते. हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

अन्विताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या पहिल्या गाडीचे फोटो शेअर केले आहेत. अन्विताने Hyundai गाडी खरेदी केली आहे. या गाडीचे फोटो शेअर करत अन्विता म्हणाली, “पहिल्या गोष्टी नेहमीच खास असतात.” याचाच अर्थ अन्विताने खरेदी केलेली अशी ही पहिली गाडी आहे. अन्विताची ही पोस्ट पाहिल्यानंतर तिच्या सहकलाकारांपासून तिच्या चाहत्यांपर्यंत सगळेच तिला शुभेच्छा देत आहेत.

आणखी वाचा : मन्नतमध्ये घुसून ‘तो’ स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करत होता, शाहरुख आला तर म्हणाला, “मला फक्त…”

आणखी वाचा : ‘पुष्पा’मुळे लागला जॅकपॉट; समांथाला मिळाली बॉलिवूडमधल्या ३ चित्रपटांची ऑफर

दरम्यान, अन्विता ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. अन्विताचे लाखो चाहते आहेत. तिला स्वीटू या भूमिकेमुळे खरी लोकप्रियता मिळाली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Yeu kashi tashi me nandayala fame sweetu aka anvita phaltankar bought her new car dcp

ताज्या बातम्या