“…अन् लग्नानंतर आमचं पहिलं भांडण हायवेवर झालं होतं”, मराठी अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ किस्सा

तिचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका सध्या चांगलीच लोकप्रिय ठरत आहेत. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेत सध्या अभिनेत्री अदिती सारंगधर ही मालविका हे नकारात्मक पात्र साकारत आहे. अदिती ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. नुकतंच तिने तिचा एक व्हिडीओ शेअर करत लग्नानंतर झालेल्या पहिल्या भांडणाचा किस्सा सांगितला आहे.

‘झी मराठी’वरील ‘हे तर काहीच नाय!’ या नव्या कार्यक्रमात अनेक कलाकार हजेरी लावत असतात. नुकतंच या कार्यक्रमात अदितीने हजेरी लावली. या कार्यक्रमात तिने स्टँडअप कॉमेडी करत तिच्या लग्नातील काही किस्से सांगितले. विशेष म्हणजे यावेळी तिने तिच्या हनिमूनचा आणि भांडण झाल्याचा किस्सा सांगितला आहे.

“लग्नाच्या वेळी मी कपाटातील सर्व दागिने, कपडे सर्व काढले आणि ते बॅगमध्ये भरले. जवळपास ५ ते ६ सुटकेस भरल्या होत्या. लग्न करुन मुलगी घरी येते याचा फील यावा यासाठी. मी त्या सर्व सुटकेस गाडीत भरल्या आणि कल्याणला गेले. लग्नानंतर त्याच बॅग लग्नाच्या दिवशी सुहासच्या गाडीत टाकल्या. लग्न झाल्याचा फील यावा म्हणून फक्त…., लग्नानंतर एक नियम असतो कुठेतरी फिरायला जायचं. त्या नियमानुसार आम्ही गोव्याला गेलो. सर्व नियमानुसार जसे गोव्याला जातात, तसे आम्हीही गोव्याला गेलो आणि त्या बॅगा तशाच होत्या म्हणजे त्यांची वरात माझ्यासोबत त्याच गाडीत तशीच होती. आम्ही गोव्यावरुन परत येत होतो.”

“गाडी भरधाव वेगात होती आणि आम्ही छान गप्पा मारत होतो. त्यावेळी बाजूने माणसे धावायला लागली. गाडी थांबवा, गाडी थांबवा, असे ते सांगत होते. त्यानंतर आम्ही मागे वळून पाहिलं तर गाडीची डिकी उघडली होती आणि मागे सर्व त्या पाच सहा बॅगा रस्त्यावर पडलेल्या होत्या. म्हणजे खऱ्या अर्थाने त्या बॅगाची वरात निघाली होती आणि त्यानंतर नवरा बायकोचं पहिलं भांडण तू डिकी उघडी ठेवली की मी उघडी ठेवली… असं म्हणत त्या हायवेवर झालं होतं.” असा किस्सा तिने यावेळी सांगितला.

दरम्यान अदितीने तिचा हा व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट केला आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे तिच्या या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Yeu kashi tashi me nandayla actress aditi sarangdhar share the story of the first argument after marriage nrp

Next Story
पुण्यातून अपहरण झालेला स्वर्णव सापडला; अभिनेता प्रसाद खांडेकर पोस्ट शेअर करत म्हणाला…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी