गेल्या काही दिवसांपासून मालिकांमध्ये बदलता ट्रेंड पाहायला मिळतोय. सुंदर, गोरीपान, नाजुक अशा मालिकांमध्ये झळकणाऱ्या नायिकांचं रुपं आता बदललं आहे. या नायिकांची जागा आता एका सामान्य मुलीच्या रुपात झळकणाऱ्या अभिनेत्रींनी घेतली आहे.

झी मराठी वरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेमधुनही हा बदललेला ट्रेंड पाहायला मिळाला. या मालिकेत मुख्य नायिकेची भूमिका साकारणारी स्वीटू एका सामान्य घरातील एक समजूतदार मुलगी आहे. क्यूट आणि गुटगुटीत अशी या स्वीटूने सध्या अनेक प्रेक्षकांची मनं जिकंली आहेत. या मालिकेतूल स्वीटू म्हणजेत अभिनेत्री अन्विता फलटणकरने चाहत्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आभार मानले आहेत.

Skin care tips jaggery face pack helpful to glowing your skin
चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या? गुळाचा करा खास वापर; त्वचा दिसेल तरुण- चमकदार
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
Kitchen jugad video wash clothes with green chilli apply on cloth
Kitchen Jugaad Video: साबणाऐवजी हिरव्या मिरचीने धुवा कपडे; विचित्र उपायाचा चमत्कारिक परिणाम
How to make raw mango dal mango dal
तुम्ही कधी चटकदार कैरीची डाळ खाल्ली आहे का? नसेल तर ही घ्या सोपी रेसिपी

लोकसत्ता डिजिटल अड्डावर अन्विताने मालिकांच्या बदलत्या ट्रेंडवर भाष्य केलंय. मालिकांच्या या बदलत्या ट्रेंडचा एक भाग असल्याचा आनंद तिने व्यक्त केला. “लहानपणा पासून अशा गोष्टींचा सामना करतो. आपल्याला वाटतं आपण सुंदर नाही कारण आपण गुटगुटीत आहोत. मात्र आता लोकांचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत आहे. याचा आनंद आहे. जाडं हे पेटनेम नसू शकतं. त्या मुलीला देखील वाटतं मला कुणी सुंदर म्हणावं.” असं अन्विता म्हणाली.

यावेळी मालिकेतील अभिनेता ओम म्हणजे शाल्वने देखील सुंदरतेच्या व्याख्येवर मत व्यक्त केलं. ” सुंदरतेची व्याख्या ही फार पूर्वीपासून खूप चुकीची आणि पठडीतली सांगण्यात आल्याने लहानपणापासून आपण तसा समज करत गेलो.” असं शाल्व म्हणाला. याचवेळी अलिकडे मात्र मोठा बदल घडतोय पाहून आनंद होत असल्याचं तो म्हणाला.

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतील ओम आणि स्वीटूला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळतेय.