गेल्या महिन्याभरापासून इन्स्टाग्रामवर एक गाणे तुफान व्हायरल होत आहे. या गाण्यावर अनेकजण रिल्स बनवत आहेत. Manike Mage Hithe असे या गाण्याचे बोल आहेत. केवळ इन्स्टाग्रामवर नाही तर फेसबुक ट्वीटरसह संपूर्ण सोशल मीडियावर या गाण्याची चर्चा आहे. यामुळे हे गाणे तुफान ट्रेंडमध्ये पाहायला मिळत आहे. दरम्यान नुकतंच या गाण्याचे मराठी व्हर्जन समोर आले आहे. विशेष म्हणजे झी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतील कलाकारांनी हे नवे व्हर्जन तयार केले आहे. सध्या त्यांनी बनवलेल्या या गाण्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

झी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका सध्या रोमांचक वळणावर येऊन ठेपली आहे. मात्र यादरम्यान शकूची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी मालिकेचा निरोप घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या जागी अभिनेत्री किशोरी आंबिये या मालिकेत शकूची भूमिका साकारणार आहे. मालिकेत कामाला सुरुवात करुन अवघे काही दिवस झाले असले तरी किशोरी आंबिये मात्र या मालिकेच्या सेटवर चांगल्याच रमलेल्या दिसत आहेत.

मालिकेच्या सेटप्रमाणे ऑफस्क्रीनही त्या धमाल करताना दिसत आहे. नुकतंच झी मराठीने त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात मालिकेतील स्वीटू, नलू मावशी आणि शकू या तिघीही एकत्र बसलेल्या दिसत आहे. यावेळी स्वीटू या गाण्याची सुरुवात करते. त्याचवेळी शकू म्हणजेच किशोरी या अभिनेत्री श्रीदेवीचे नाव घेत त्याचे मराठी व्हर्जन तयार करतात. त्यानंतर नलू ही “मला गावाला जायचं ना, त्या गावात पाटील ना,” असे शब्द गुणगुणते. यानंतर स्वीटू “किती मुलं मागे तिथे” असे गमतीत म्हणते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वीटू, नलू मावशी आणि शकू यांनी तयार केलेल्या या गाण्याचे मराठी व्हर्जन सध्या तुफान व्हायरल होत आहे. माणिके मागे हिते या गाण्याची क्रेझ अद्यापही लोकांच्या मनावर कायम आहे. त्यातच मालिकेतील कलाकारांनी या गाण्याचे बनवलेले व्हर्जन ऐकून लोक या व्हिडीओ लाइक्स आणि कमेंट्स करत आहेत.