झी मराठी वाहिनीवर लवकरच किचन कल्लाकार नावाचा एक नवीन कार्यक्रम सुरु होणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर्वांचा लाडका मराठमोळा अभिनेता संकर्षण कराडे करत आहे. गेल्या काही दिवसांपासून या नव्या कार्यक्रमाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. या मालिकेचे प्रोमो सोशल मीडियावर हिट ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतंच झी मराठीने या कार्यक्रमाचा आणखी एक प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे. यात काही कलाकार त्यांचे किचनमधील किस्से सांगत असल्याचे दिसत आहे.

झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे. यात काही कलाकार हे त्यांच्या स्वयंपाकाचा बेत कसा फसला याबाबतचा किस्सा सांगताना दिसत आहे. या व्हिडीओची सुरुवात अभिनेत्री श्रेया बुगडेच्या किस्साने होत आहे. यात श्रेया बुगडेने लग्नानंतर पहिल्यांदा मोदक बनवताना झालेली गंमत सांगितली आहे.

‘मला लग्न झाल्यावर माझ्या सासुबाईंनी मोदक करायला सांगितला होता. मी त्यांना येत नाही असे सांगूनही त्यांनी तू बनव काहीही होत नाही, असे सांगत मोदक बनवायला सांगितला. यात गणपती बाप्पाला दाखवलेल्या 21 मोदकापैकी तिचा एक मोदक कसा वेगळा आणि चपटा झाला होता,’ ही गंमत तिने सांगितले आहे. तर अभिनेता संदीप पाठक याने त्याचा पोहे करण्याचा बेत कसा फसला याबाबतचा किस्सा सांगितला आहे. संदीप पाठकने पहिल्यांदा पोहे करत होता. मात्र ते पोहे काहीही केल्या पिवळे होत नव्हते. त्यामुळे त्याने जास्त हळद घातली आणि त्यामुळे त्याला फक्त हळदीची चव येत होती. यामुळे आता तो पोहे करताना नेहमी काळजी घेतो, असे त्याने यात सांगितले आहे.

अभिनेत्री हेमांगी कवीचा गोविंदाच्या गाण्यावर भन्नाट डान्स, नेटकरी म्हणतात, “छान आहे पण…”

त्यासोबतच अभिनेत्री वंदना गुप्ते यांच्या पुरणपोळीचा बेत फसला होता. त्यांनी नवीन घरात खास सासू सासऱ्यांसाठी खास पुरणपोळ्यांचा बेत आखला होता. मात्र त्या पुरण पोळीच्या भाकरी कशा झाल्या याची गंमत त्यांनी सांगितली आहे. तर चला हवा येऊ द्या फेम तुषार देवल यांनी देखील पोळीचं पीठ मळता येते. मात्र आजपर्यंत त्यांना कधीच नीट गोल पोळी लाटता आली नाही असे सांगितले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान हे सर्व किस्से असलेला व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना … आणि पदार्थ फसला. पहा या कलाकारांच्या फसलेल्या पदार्थांची गंमत, असे सांगितले आहे. येत्या १५ डिसेंबरपासून रात्री ९.३० वाजता हा कार्यक्रम प्रदर्शित होणार आहे. ‘मस्त मजेदार,किचन कल्लाकार’ असे या कार्यक्रमाचे नाव आहे.