महाराष्ट्रातील तमाम महिलांचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणून होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे नाव घेतले जाते. गेल्या १७ वर्षांपासून अधिक काळ या कार्यक्रमाद्वारे तमाम वहिनींचा सत्कार आणि सन्मान केला आहे. नुकतंच झी मराठीवर होममिनिस्टर या कार्यक्रमाच्या नवीन पर्वाला सुरुवात झाली आहे. महामिनिस्टर असे नाव असलेल्या या नवीन पर्वात विजेत्या वहिनीला चक्क ११ लाखांची पैठणी भेट म्हणून मिळणार आहे. या पर्वाची घोषणा झाल्यानंतर अनेकांनी या पैठणीच्या किंमतीवर टीका केली होती. नुकतंच आदेश बांदेकर यांनी या टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

झी मराठीवर महामिनिस्टरमध्ये विजेत्या वहिनीला चक्क ११ लाखांची पैठणी भेट म्हणून मिळणार आहे. या ११ लाखांच्या पैठणीची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या ११ लाखांच्या पैठणीवरुन काही नेटकऱ्यांनी विरोध केला आहे. इतक्या मोठ्या रक्कमेची पैठणी देण्यापेक्षा त्या कुटुंबाला आर्थिक स्वरुपात मदत करावी, अशी टीका या कार्यक्रमावर होताना दिसत आहे. नुकतंच यावर आदेश बांदेकरांनी मौन सोडत स्पष्टपणे उत्तर दिले आहे.

“महाराष्ट्रातील घराघरातील माऊली दररोज विविध जबाबदाऱ्या पार पाडत असतात. त्यांना विविध कामातून एक दिवस तरी आनंदाचा मिळायला हवा. त्यामुळे हा प्रत्येक क्षण त्यांच्या स्मरणात राहावा, अशा पद्धतीने आनंद देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. आतापर्यंत ५५०० घरांमध्ये होम मिनिस्टरची ही यात्रा जाऊन पोहोचली आहे. या प्रवासाला १८ वर्षे झाली. यादरम्यान कित्येक लाख किलोमीटरचा प्रवास झाला आणि त्यावेळी ५५०० माऊलींचा महाराष्ट्राचं महावस्त्र पैठणी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला”, असे आदेश बांदेकर म्हणाले.

आदेश भाऊजींनी स्वत: सांगितले ११ लाखांच्या पैठणीचे आणखी एक वैशिष्ट्ये, म्हणाले “ही पैठणी…”

“ही संकल्पना पूर्णपणे झी मराठीची आहे. मी पहिल्यापासूनच निवेदकाच्या भूमिकेत आहे. त्यामुळे माझं आणि झी मराठीचे प्रत्येक कुटुंबाचं नातं जोडलं गेलं आहे. या ११ लाखांच्या पैठणीबाबत झी मराठीची भावना अगदी स्वच्छ आणि निर्मळ होती. ही संकल्पना निलेश मयेकर यांनी मांडली. त्याक्षणी आम्हाला असे वाटलं की ११ लाखाची पैठणी का असू नये? यावेळी ही भावना अधोरेखित झाली.”

“तिच्या कपाटात ११ लाखांची पैठणी का असू नये? तिने आयुष्यभर पैठणीचे स्वप्न बघितलेलं असतं. त्यामुळे हा विचार सुरु झाला. यानंतर काही जणांनी हा प्रश्नही उपस्थित केला. पण मला हे सांगताना अतिशय आनंद होत आहे की, ती पैठणी कशी तयार होते हे पाहण्यासाठी आम्ही येवल्याला गेलो होतो. त्या ठिकाणी कापसे पैठणी होते. ते पाहिल्यावर आम्ही थक्क झालो, आमच्याकडे शब्द नव्हते, फक्त डोळ्यात पाणी होतं. विशेष म्हणजे जे विणकर तिथे पैठणी विणत होते, त्यांच्याही डोळ्यात पाणी होतं हे आम्ही पाहिलं”, असा अनुभव आदेश बांदेकरांनी सांगितला.

“आई बाबा मी दररोज…”, आदेश बांदेकरांच्या लेकाची ‘ती’ पोस्ट चर्चेत

त्यापुढे आदेश बांदेकर म्हणाले, “२००४ च्या दरम्यान जेव्हा होम मिनिस्टर हा कार्यक्रम सुरू झाला. त्याआधी सगळे विणकर कर्जबाजारी झाल्याने हे आपापले यंत्रमाग विकून नुकसान झाल्यामुळे गाव सोडत होते. ज्या क्षणी होम मिनिस्टर सुरु झालं, त्यानंतर प्रत्येक दिवसाला एक पैठणी विकली जायची. कालांतराने दिवसाला शंभर पैठणी साडीची विक्री सुरु झाली. त्यातून असंख्य विणकारांच्या हाताला काम मिळालं”, असे त्या ठिकाणी असलेले विणकर म्हणाले.

या ११ लाखांच्या पैठणीला बघायला गेलो तेव्हा मी थक्क झालो होतो. कारण ही पैठणी ज्यांच्या हातातून विणली जाते त्या विणकर कुटुंबातील दाम्पत्याला नीट बोलता येत नाही. त्यांना ऐकूही येत नाही. अशा विणकरांना जी मजुरी मिळणार आहे, ती त्यांच्या कुटुंबाला मिळणार आहे याचा आनंद जास्त मोठा आहे, असेही आदेश बांदेकरांनी सांगितले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zee marathi maha minister actor aadesh bandekar comment about rs 11 lakh paithani saree criticism nrp
First published on: 17-04-2022 at 12:25 IST