scorecardresearch

“माझा या मालिकेतील सहभाग संपला”, ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतून ३ कलाकारांची एक्झिट

या कुटुंबातील सर्वच पात्र चांगलेच चर्चेत पाहायला मिळाले.

man udu udu zhala
मन उडू उडू झालं कानविंदे कुटुंब

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणून ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेकडे पाहिलं जाते. सध्या ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरताना दिसत आहे. ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेत इंद्रा आणि दिपूची हटके लव्हस्टोरी प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे. लवकरच या मालिकेत इंद्रा आणि दिपू विवाहबंधनात अडकणार असल्याचे पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे शलाका देशपांडेचे सासर असलेल्या कानविंदे कुटुंबाने नुकतंच मालिकेतून एक्झिट घेतली. शलाकाचा नवरा नयन कानविंदे, त्याची आई स्नेहलता आणि वडील विश्वासराव या तिघांनीही ही मालिका सोडली आहे.

मन उडू उडू झालं या मालिकेच्या कथानकात विविध रंजक ट्रॅक पाहायला मिळत आहेत. या मालिकेत दिपूची बहिण शलाका हे पात्र शर्वरी कुलकर्णी हिने साकारलं आहे. तर या मालिकेत शलाकाचा नवरा नयन कानविंदे, त्याची आई स्नेहलता आणि वडील विश्वासराव यांची भूमिका प्रचंड गाजली होती. या भूमिकेचा ट्रॅक संपल्याने हे त्रिकूट मालिकेतून एक्झिट घेणार आहे. यात नयनची भूमिका ही अमित परब याने साकारली. एका कॉर्पोरेट कंपनीत काम करणाऱ्या अमितने कामातून वेळ काढत या भूमिकेला न्याय दिला होता. तर शलाकाचा छळ करणारी सासू स्नेहलता ही भूमिका कस्तुरी सारंग यांनी उत्तम साकारली होती.

“मी मालिका सोडलेली नाही…”, ‘मन उडू उडू झालं’ मालिका सोडण्यावर हृता दुर्गुळेचे स्पष्टीकरण

या दोन्हीही भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात राहिल्या. या मालिकेतील खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या पात्रांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. ही मालिका सुरु झाल्यानंतर कानविंदे कुटुंबाची एंट्री झाली होती. या कुटुंबातील सर्वच पात्र चांगलेच चर्चेत पाहायला मिळाले. नुकतंच या कलाकारांनी शेवटच्या भागाचे शूटींग पूर्ण केले होते.

या मालिकेने २०० भाग पूर्ण केले. यावेळी नयनची भूमिका साकारणारा अमित म्हणाला, “या मालिकेने मला घराघरात पोहोचवलं आहे. त्याआधी मी खूप ऑडिशन्स दिल्या होत्या. पण माझी निवड होत नव्हती. पण मला मन उडू उडू झालं यासारख्या लोकप्रिय मालिकेचा एक भाग होता आलं याचं समाधान आहे. ही माझ्यासाठी खूप मोठी संधी आहे. माझा या मालिकेतील सहभाग जरी संपला असला तरी प्रत्येक कलाकाराशी असलेलं नाते कायम राहिल.”

‘मन उडू उडू झालं’ मालिकेत येणार नवा ट्विस्ट, दिपूला मिळवण्यासाठी इंद्रा देणार अग्निपरीक्षा

‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत लवकरच इंद्रा आणि दीपूचा लग्नसोहळा दाखवला जाणार आहे, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे अखेर दीपू आणि तिच्या इंद्राचा विरह संपणार असून त्यांच्या घरी सनई वाजणार असे संकेत मिळाले आहेत. नुकतंच अजिंक्यने याबाबतचे संकेत दिले आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Zee marathi man udu udu zhala tv serial kanvinde family took exit from show nrp