झी मराठी वाहिनीवरील ‘देवमाणूस २’ या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेचा पहिला भाग प्रचंड गाजला. म्हणूनच मालिकेची लोकप्रियता पाहून दुसरा भाग प्रदर्शित करण्यात आला. प्रेक्षकांनी ‘देवमाणूस २’ला देखील भरभरुन प्रतिसाद दिला. या मालिकेच्या तिसऱ्या भागाची देखील चर्चा रंगत होती. मालिकेचा तिसरा भाग येणार की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. पण त्यापूर्वीच ‘देवमाणूस’बाबत एक नवी माहिती समोर आली आहे.

आणखी वाचा – Video : ‘देवमाणूस ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार? किरण गायकवाडच्या नव्या व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

Victory over division of voting caused by independents propaganda war on social media in last phase
अपक्षांमुळे होणाऱ्या मतविभाजनावर विजयाचा कौल? अंतिम टप्प्यात समाज माध्यमांवर प्रचारयुद्ध
Chess Candidates 2024, World Championship contender, D Gukesh, Gukesh
अनुभवात कमी, रँकिंगमध्ये खाली…तरीही कँडिडेट्स स्पर्धेत गुकेश कसा ठरला विजयी? आनंदप्रमाणे जगज्जेता बनण्याची शक्यता किती?
What is Microsoft warning to India about China regarding AI
‘एआय’च्या माध्यमातून निवडणुकांमध्ये गोंधळ उडवणे शक्य? चीनबाबत मायक्रोसॉफ्टचा भारताला कोणता इशारा?
randeep surjewala made controversial remarks on hema malini
हेमा मालिनी यांच्याबाबत रणदीप सुरजेवालांचं वादग्रस्त वक्तव्य, कंगनाची तिखट शब्दांत प्रतिक्रिया, “द्वेष आणि तिरस्कार..”

‘देवमाणूस’ ही मालिका आता हिंदीमध्येही प्रदर्शित होणार आहे. म्हणजेच हिंदी भाषिक प्रेक्षकांनासुद्धा मराठीमधील ही बहुचर्चित मालिका पाहता येईल. या मालिकेचा हिंदीमधील प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला. अँड टीव्ही वाहिनीवर ही मालिका प्रेक्षकांना पाहता येणार आहे. ‘देवमाणूस’मध्ये मुख्य भूमिका साकारणार अभिनेता किरण गायकवाडच हिंदी मालिकेमध्येही काम करताना दिसेल.

पाहा व्हिडीओ

मालिकेचा प्रोमो प्रदर्शित होताच अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत. तसेच काहींनी ‘देवमाणूस’ मालिकेचं कौतुक केलं आहे. सरू आजी, मंगल ताई, टोन्या, डिंपल, बज्या, नाम्या, रेश्मा, इन्स्पेक्टर दिव्या सिंग ही या मालिकेमधील पात्र प्रचंड गाजली. डॉ. अजित कुमार देव या पात्राला तर प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं.

आणखी वाचा – Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटबाहेरच नम्रता संभेराव-प्रसाद खांडेकरचा भन्नाट डान्स, व्हायरल व्हिडीओ तुम्ही पाहिलात का?

आता या सगळ्या पात्रांचा थरार पुन्हा एकदा हिंदीमध्ये प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. येत्या २४ सप्टेंबरपासून रात्री आठ वाजता ही मालिका प्रसारित होईल. मराठीमध्ये या मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवली. आता हिंदीमध्ये या मालिकेला कितपत प्रतिसाद मिळणार हे पाहावं लागेल.