झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांच्या यादीमध्ये ‘देवमाणूस’ मालिकेचा देखील समावेश आहे. या मालिकेच्या पहिल्या भागाने प्रेक्षकांना वेड लावलं. मालिकेला प्रेक्षकांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहता याचा दुसरा भाग प्रदर्शित करण्यात आला. ‘देवमाणूस २’ने देखील प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. देवमाणूस ही भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड तर घराघरांत पोहोचला. ‘देवमाणूस २’ मालिकेने आता प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. पण आता या मालिकेबाबत नवी चर्चा सुरु झाली आहे.

आणखी वाचा – Video : काकांच्या निधनानंतर ढसाढसा रडू लागला प्रभास, अंतिम दर्शनाला पोहोचला अन्…

‘देवमाणूस’ ही भूमिका साकारणाऱ्या किरणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याच्या या व्हिडीओमुळे ‘देवमाणूस ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची नवी चर्चा सुरु झाली आहे. तसेच नेटकऱ्यांनी देखील ‘देवमाणूस’ मालिकेचा पुढील भाग प्रदर्शित होणार का? ‘देवमाणूस ३’ मालिका कधी येणार? असे अनेक प्रश्न विचारले आहेत.

पाहा व्हिडीओ

किरणने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो जेलमधील कपड्यांमध्ये दिसत आहे. वाढलेले केस, दाढी आणि जेलमधील कपडे अशा विचित्र अवतारामध्ये तो वाड्यात प्रवेश करताना दिसत आहे. त्याच्या या एण्ट्रीमुळे ‘देवमाणूस ३’ मालिका लवकरच प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जात आहे. डिंपलची मुलगी – देवमाणूस पार्ट ३, देवमाणूस ३ लवकरच येणार, या मालिकेच्या पुढील भागासाठी आम्ही वाट पाहत आहोत अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

आणखी वाचा – अक्षय कुमारच्या मराठमोळ्या हेअर स्टायलिस्टचं निधन, अभिनेता भावूक होत म्हणाला, “अजूनही विश्वास बसत नाही की…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मालिकेच्या सर्वेसर्वा आणि निर्माती म्हणजेच अभिनेत्री श्वेता शिंदेने देखील एक पोस्ट केली आहे. किरण गायकवाडचा देवमाणूसच्या लूकमधील फोटो शेअर करत ती म्हणाली, “लवकरच तुम्हा सगळ्या कलाकारांबरोबर काम करण्यास उत्सुक आहे.” या दोघांच्याही पोस्टमुळे ‘देवमाणूस ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं बोललं जात आहे.