छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’ने टिआरपीचे अनेक रेकॉर्ड तोडले होते. ‘देवमाणूस’ या मालिकेने ऑगस्ट २०२१ ला प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर अलिकडेच या मालिकेचं दुसरं पर्व सुरू झालं आहे. ज्याचा प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मालिकेत प्रेक्षकांना अजितकुमार देव हा एका वेगळ्या रूपात पाहायला मिळतोय. या मालिकेनं सध्या वेगळं वळण घेतल्याचं पाहायला मिळतंय. पण आगामी काळात मालिकेत अनपेक्षित घडामोडी घडताना दिसणार आहेत. याशिवाय मालिकेत नवा ट्वीस्टही पाहायला मिळणार आहे.

देवमाणूस या मालिकेने पहिल्या पर्वापासूनच प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवलं आहे. या मालिकेतील विलक्षण वळण प्रेक्षकांना आश्चर्यचकित करतात. नुकतंच मालिकेत डॉक्टरने डिंपलसोबत हातमिळवणी केल्याचं पाहायला मिळालं. आता हे दोघे मिळून डाव आखणार इतक्यातच समोरून मालिकेत एक नवीन चेहऱ्याची एंट्री झालेली प्रेक्षकांना पाहायला मिळाली. सोनाली या नवीन भूमिकेची ओळख नुकतीच मालिकेत प्रेक्षकांना झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोनाली ही डॉक्टरांकडे तिच्या जमिनीच्या निमित्ताने मदत मागायला येते. समोरून मदत मागायला आलेल्या सोनालीला मदत करायची संधी डॉक्टर हातातून कशी निसटू देतील. आता डॉक्टर आणि डिंपल एकत्र आले आहेत त्यामुळे आता मालिकेत रंजक वळण आलेलं पाहायला मिळणार आहे. मालिकेच्या आगामी एपिसोडमध्ये काही अनपेक्षित घडामोडीदेखील पाहायला मिळाणार आहेत.