महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने येणाऱ्या पुण्यातील एका खाणावळीचे चालक काका विद्यार्थ्यांच्या तक्रारी ऐकून फारच वैतागले.
अखेर उपाय सापडला. खाणावळीत पाटी झळकली.
“तुम्हाला काय आवडते यापेक्षा आम्ही आज काय केले आहे ते महत्त्वाचे आहे. त्यामुळे आधी फळ्यावरील आजचे पदार्थ वाचा. मगच जेवायचे आहे का ते ठरवा.”
काकांची ही मात्रा अचूक लागू पडली.