News Flash

घरचे झाले थोडे..

माणसाला अन्न आणि वस्त्राइतकीच महत्त्वाची गरज असते निवाऱ्याची. म्हणजेच घराची. घर या शब्दावरून मराठी भाषेत वेगवेगळ्या म्हणी आणि वाक् प्रचार आहेत. त्याबद्दल-

जिचा नवरा दासट…

मामा, काका आणि मावशी, आत्या या चार नात्यांची इंग्रजीमध्ये अंकल आणि आंटी या दोन शब्दात बोळवण केलेली दिसते. मराठीत मात्र नातेसंबंधांवरून आलेल्या म्हणी नातेसंबंधांची समृद्धी दाखवतात.

…अंगण वाकडे

फेसबुकवरच्या त्या फोटोमध्ये टुमदार घर, अंगण, कुंपण बघून मला चटकन माझं गावचं घर आठवलं. मग, घराच्या विविध भागांवरून असलेल्या म्हणी, वाक्प्रचारांनी पद्मजाची शिकवणी सुरू केली.

पाणी जोखणे

लाथ मारीन तिथे पाणी काढेन असा आत्मविश्वास असला तरी परिस्थितीचं पाणी नीट जोखलं नाही तर मात्र प्रतिस्पध्र्याकडून पाणी पाजले जाण्याची शक्यता असते.

आग रामेश्वरी…

एकेक शब्द मराठी भाषेत किती प्रकारे वापरला जातो याचं वैविध्य थक्क करणारं आहे. आग हा एकच शब्द घेतला तरी त्यावरून भरपूर म्हणी, वाक् प्रचार तयार झाले आहेत.

पी हळद, हो गोरी…

स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या भाज्यांना, वेगवेगळ्या पदार्थाना मराठी भाषेच्या म्हणी वाक् प्रचारांमध्ये मानाचं स्थान मिळालं आहे.

असतील शिते…

आपण मराठी माणसं वडय़ाचं तेल वांग्यावर काढतो, नमनाला घडाभर तेल ओततो, दुधाची तहान ताकावर भागवतो, शिळ्या कढीला ऊत आणतो आणि शितावरून भाताची परीक्षाही करतो...

हत्तीच्या पावलांनी…

खार, मासा, घोडा, उंट, हत्ती, सरडा, मुंगी या सगळ्यांच्याच वैशिष्टय़ांचा उपयोग करून घेत मराठी भाषाव्यवहार समृद्ध होत गेला आहे.

म्हशीने रांधले…

आपल्या आसपास असणारे-नसणारे पशू-पक्षी आपल्या भावविश्वाचाच भाग असतात. त्यामुळे मराठी भाषेने आपल्या विश्वात त्यांनाही सामील करून घेतले आहे.

चोरावर मोर आणि पोपटपंची

म्हणी, वाक्प्रचार हे कोणत्यीही भाषेचे वैभव असते. या लेखात म्हणींचा आधार घेत पद्मजाला पशु- पक्ष्यांची माहिती करून दिली आहे..

जर आणि तर

एकाच शब्दाच्या वेगवेगळ्या अर्थच्छटा शोधण्यासाठी आम्ही शब्दार्थाच्या भेंडय़ा खेळायला सुरूवात केली आणि मराठी भाषेचा मोठा खजिनाच पद्मजासमोर खुला केला.

भूत आणि काळ

एका शब्दाचे वेगवेगळे अर्थ असण्यात भाषेची गंमत तर असतेच पण त्यातून हेही समजते की अर्थाच्या वेगवेगळ्या छटा मांडणारी आपली भाषा किती समृद्ध आहे.

शब्द एक, अर्थ अनेक

मराठीमधल्या फळ या शब्दाला दोन अर्थ आहेत. त्याचा इंग्रजीमधला अर्थ आहे, फ्रूट. मराठीमध्ये कळ म्हणजे एखाद्याची काढलेली कुरापत आणि दुसरा अर्थ बटण..

शब्दार्थाच्या भेंडय़ा

मराठीत एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ कसे होतात, अंकांचा वाक्यात उपयोग हे सगळं शिकवल्यावर मराठी भाषेच्या शिकवणीचा पुढचा भाग म्हणून आम्ही सगळ्यांनी...

पाचामुखी परमेश्वर

अंकांचा उपयोग फक्त आकडेमोड करण्यासाठी नसतो तर त्यांच्यामुळे आपल्याला ध्वनित असलेले वेगवेगळे अर्थ सांगता येतात.

सोळा आणे खरे

अंक, आकडे यांचं स्थान खरं म्हणजे गणितात. रोजच्या व्यवहारांच्या घडामोडींमध्ये. पण मराठी भाषेने वाक्प्रचार, म्हणींमध्ये आकडय़ांना स्थान देऊन त्यांचं महत्त्व अधोरेखित केलं आहे.

तोंडपाटीलकी

आवडता पदार्थ पाहिल्यावर खाण्याची तीव्र इच्छा होणे म्हणजे तोंडाला पाणी सुटणे तर खूप घाबरून जाणे म्हणजे तोंडचे पाणी पळणे.

पाऊल उचलणे

इतर अवयवांप्रमाणेच गुडघा, मांडी, पोटरी, तळवा, टाच या अवयवांवरून निघालेले वाक् प्रचार पाहिले की मराठीचे भाषिक वैविध्य जाणवते.

पायावर धोंडा

पायाभरणी करणे, पायधूळ झाडणे, पाय फुटणे, पायउतार होणे, एका पायावर तयार असणे, पायाला भिंगरी असणे, पाय जमिनीवर नसणे, पाया पडणे..

डोक्यावर घेणे

आपण मराठी माणसं एखाद्याला डोक्यावर घेतो, एखादा आपल्या डोक्यात जातो, एखाद्यासमोर आपल्याला डोकं आपटावं लागतं.

दंड थोपटणे, कोपराने खणणे!

मराठी भाषेने आपल्या शरीराच्या बऱ्याच अवयवांना कामाला लावलं आहे. त्यामुळे एखाद्या माणसाला दुसऱ्याच्या खांद्याला खांदा लावून उभं राहावं लागतं. कुणाला तरी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपावं लागतं...

हातसफाई हातघाई…

हात हा अवयव आपल्याला मराठी माणसांना फक्त वेगवेगळ्या कामांसाठीच नाही, तर तो भाषेच्या पातळीवरही उपयोगाचा आहे.

उचलली जीभ…

मराठी माणसाच्या जिभेला हाड नसते, तो जिभेचे चोचले पुरवतो, तो उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असे प्रकारही अधनंमधनं करत असतो.

नाकपुराण

नाक हा आपल्या शरीरातला महत्त्वाचा अवयव. मराठी भाषेने त्याला बरेच कामाला लावले आहे. त्यामुळेच आपण नाकाने कांदे सोलतो. नाक खुपसतो. एखाद्याच्या नाकात वेसण घालतो...

Just Now!
X