राज्यात एसटीतील करोनाबाधित कर्मचाऱ्यांची संख्या २ हजारांवर गेली असून त्यापैकी ३२९ कर्मचारी गेल्या अवघ्या १२ दिवसांत बाधित झाले आहेत. मृत कर्मचाऱ्यांची संख्याही ६७ पर्यंत पोहोचली आहे.

एसटी महामंडळाचे ३० सप्टेंबपर्यंत १ हजार ६७९ कर्मचारी करोनाबाधित होते, तर ५३ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. परंतु आता गेल्या १२ दिवसांत वाढ झाली आहे. जून महिन्यापासून एसटीची सेवा हळूहळू विस्तारते आहे. ग्रामीण भागात सुरू असलेली सेवा आता जिल्ह्याबाहेरही सुरू करण्यात आली आणि एसटीचे चालक, वाहकांपासून सर्वच कर्मचारी पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले. त्यामुळे कर्तव्यावर असतानाही त्यांचा अनेकांशी संपर्क येऊ लागला. त्यामुळे कर्मचारी करोनाबाधितही होऊ लागले, तर काही कर्मचारी कर्तव्यावर नसताही करोनाबाधित झाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांचीही नोंद होत आहे. १३ ऑक्टोबपर्यंत करोनाबाधित कर्मचाऱ्यांची संख्या २ हजार ०८ झाली आहे. यामध्ये मंगळवारी आणखी ३३ कर्मचारी बाधित झाल्याची नोंद झाली आहे. एकू ण १ हजार ५३५ कर्मचारी करोनामुक्त झाले असून ४०६ कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत.

विभाग करोनाबाधित

* मुंबई १४९

* ठाणे २२८

* नाशिक   १३२

* पुणे  १०१

* सांगली   १५०

* सोलापूर  ११२

* रायगड   ८५

* जळगाव  ८५