पश्चिम रेल्वेनंतर अखेर आता मध्य रेल्वे मार्गावरही एसी लोकल धावू लागली आहे. विरार-चर्चगेट, ठाणे-पनवेल पाठोपाठ आता मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण मुख्य मार्गावर एसी लोकलला सुरुवात झाली आहे. कुर्ला येथून आज पहिली एसी लोकल रवाना झाली असून सेवेला शुभारंभ झाला आहे. दरम्यान सामान्य लोकलच्या काही फेऱ्या रद्द होणार असल्याने प्रवाशांच्या नाराजीला तोंड द्यावे लागण्याची चिन्हे आहेत.

एसी लोकल सुरु झाल्याने प्रवाशांनीही आनंद व्यक्त केला आहे. हा एक चांगला निर्णय असून उन्हाळ्यामध्ये दिलासादायक ठरेल अशी आशा एका लोकल प्रवाशाने एएनआयशी बोलताना व्यक्त केली आहे.

Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
1878 summer special trains from Western Railway and 488 from Central Railway
पश्चिम रेल्वेवरून १,८७८ आणि मध्य रेल्वेवरून ४८८ उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या
Chalisgaon, railway trains canceled,
चाळीसगावमधील कामामुळे तीन दिवस काही रेल्वे गाड्या रद्द
dombivli, central railway trains running late marathi news
डोंबिवली: ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वे सेवा कोलमडली

मध्य रेल्वेच्या ताफ्यात चार एसी लोकल असून यातील एक टाळेबंदीआधी ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बरवर चालवण्यात येत होती. तिच्या दिवसाला १६ फेऱ्या होत होत्या. करोनाकाळात ही लोकल तात्पुरती बंद आहे. प्रवाशांची संख्या हळूहळू वाढत असल्याने ट्रान्स हार्बरवरही वातानुकूलित सेवा लवकरच पुर्ववत केली जाईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.

पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात सध्या सात एसी लोकल असून त्यातील एकच सेवेत आहे. तिच्या दिवसाला १२ फेऱ्या होतात. आता एक एसी लोकल गुरुवारपासून सीएसएमटी ते कल्याण मार्गावर चालवली जाणार आहे. सध्या करोनामुळे सर्वसामान्य प्रवाशांना याचा लाभ होणार नसला, तरी रेल्वे सर्वांसाठी सुरू होईल तेव्हा अधिकाधिक वापर होईल, अशी रेल्वेला आशा आहे. तिकीट दर अधिक असल्याने पश्चिम आणि ट्रान्स हार्बर या दोन्ही मार्गावर काही फे ऱ्या वगळता या गाडय़ांना प्रतिसाद कमी आहे. मध्य रेल्वेवर या गाडय़ांना प्रतिसाद कसा मिळतो, याकडेही रेल्वेचे लक्ष आहे.

फेऱ्या कशा?
मुख्य मार्गावर पहिली एसी लोकल पहाटे कुर्ल्याहून सीएसएमटीसाठी ५.४२ वाजता सुटेल. त्यानंतर डोंबिवलीसाठी सकाळी ६.२३ वाजता सुटणार आहे. यात सीएसएमटी ते कुर्ला ते सीएसएमटी आणि सीएसएमटी ते डोंबिवली ते सीएसएमटीसाठी प्रत्येकी चार लोकल फेऱ्या होतील. तर सीएसएमटी ते कल्याण ते सीएसएमटी अशा दोन फेऱ्या होतील.

सोमवार ते शनिवार..
* एसी लोकलसेवा सोमवार ते शनिवार चालवण्यात येणार असून सध्या अत्यावश्यक सेवा कर्मचारी आणि सर्व महिला प्रवाशांनाही यातून प्रवासाची परवानगी असेल.

थोडा इतिहास…
मुंबईत पहिली एसी लोकल २५ डिसेंबर २०१७ रोजी पश्चिम रोजी पश्चिम रेल्वेवर सुरू झाली. पहिल्या दोन वर्षांत ९५.८१ लाख प्रवाशांनी त्यातून प्रवास केला. मध्य रेल्वेच्या प्रवाशांचीही वातानुकू्लित रेल्वेसेवेची मागणी गेल्या दोन वर्षांपासून होती. ती आता पूर्ण झाली आहे.

 

वेळापत्रक
कुर्ला ते सीएसएमटी : प.५.४२ वा
सीएसएमटी ते डोंबिवली : स.६.२३ वा
डोंबिवली ते सीएसएमटी : स.७.४७ वा
सीएसएमटी ते कुर्ला : स.९.१२ वा
कुर्ला ते सीएसएमटी : सायं-४.३६ वा
सीएसएमटी ते कल्याण : सायं.५.१२
कल्याण ते सीएसएमटी : सायं.६.५१
सीएसएमटी ते डोंबिवली : रा.८.२२ वा
डोंबिवली ते सीएसएमटी : रा.९.५९ वा
सीएसएमटी ते कुर्ला : रा.११.२५