X

पाहा: पुराणकाळात देवही घालायचे हेल्मेट…

पुराणकाळात भारतीय देव-देवता त्यांच्या वाहनावरून प्रवास करताना हेल्मेटचा वापर करत असत, या आशयाची एक जाहिरात सध्या सोशल मिडीयावर प्रचंड धुमाकुळ घालत आहे.

पुराणकाळात भारतीय देव-देवता त्यांच्या वाहनावरून प्रवास करताना हेल्मेटचा वापर करत असत, या आशयाची एक जाहिरात सध्या सोशल मिडीयावर प्रचंड धुमाकुळ घालत आहे. भारतीय देव डोक्यावर परिधान करत असलेले मुकूट म्हणजे त्यांच्या काळातील हेल्मेट होते, असे या जाहिरातीत दाखविण्यात आले आहे. जाहिरातीच्या सुरूवातीला विष्णु गरुडावरून, दुर्गा सिंहावरून, गणपती उंदरावरून प्रवासाला निघताना दाखवले आहेत. मात्र, अचानक कसलीतरी आठवण झाल्याप्रमाणे तिन्ही देवांची वाहने अचानक जागच्या जागी थबकतात. त्यानंतर काही क्षणांतच आकाशातून प्रत्येक देवाच्या डोक्यावर मुकूटरूपी हेल्मेट येऊन विराजमान होते आणि देव पुढच्या प्रवासासाठी निघतात, असे चित्रण जाहिरातीमध्ये दाखविण्यात आले आहे. ‘तुम्हाला जे वाचवतात, तेदेखील स्वत:च्या डोक्याचे रक्षण करतात. तेव्हा तुम्हीसुद्धा करा’, असे वाक्य जाहिरातीच्या शेवटी झळकते. या जाहिरातीच्या माध्यमातून दुर्गा, विष्णु आणि गणपती हे देव असूनसुद्धा प्रवास करताना कशाप्रकारे सुरक्षेचा विचार करत, ही गोष्ट प्रेक्षकांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

  • Tags: loksatta,