News Flash

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन नानावटी रुग्णालयात दाखल

आराध्या बच्चनही रुग्णालयात दाखल

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनलाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिच्यासोबत तिच्या मुलीला अर्थात आराध्या बच्चनलाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ऐश्वर्याला ताप आला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तिला आणि तिच्या मुलीला म्हणजेच आराध्यालाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दोन दिवसांपूर्वीच या दोघींचीही कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. एएनआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

महानायक अमिताभ बच्चन यांना १२ जुलैच्या रात्री नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांनी त्यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती ट्विट करुन दिली होती. त्यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चनलाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं अभिषेकनेही त्याची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती ट्विट करुन दिली होती. आता त्यानंतर पाच दिवसांनी म्हणजेच आज काही वेळापूर्वीच अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक ऐश्वर्याची मुलगी आराध्या या दोघींनाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दोघींची करोना टेस्टही १३ जुलै रोजी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर या दोघी होम क्वारंटाइन होत्या. मात्र आज ऐश्वर्याला ताप आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून या दोघींनाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

१२ जुलै रोजी जेव्हा अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन या दोघांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली तेव्हा काही प्रसारमाध्यमांनी असंही वृत्त दिलं होतं की ऐश्वर्याची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. मात्र १३ जुलै रोजी ऐश्वर्याची टेस्ट पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर ऐश्वर्या आणि तिची मुलगी आराध्या या दोघीही होम क्वारंटाइन झाल्या. आज काही वेळापूर्वी ऐश्वर्याला ताप आला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ऐश्वर्या आणि तिची मुलगी आराध्या या दोघींनाही नानावाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2020 9:57 pm

Web Title: aishwarya and aaradhya bachchan admitted in nanavati hospital scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 सोनाक्षीची ढासू एण्ट्री; ‘भूज द प्राइड ऑफ इंडिया’चं नवं पोस्टर रिलीज
2 ‘गरीबांवर असा अत्याचार भारतातच होऊ शकतो’; तो व्हिडीओ पाहून अभिनेत्याची पोलिसांवर टीका
3 “हा पदार्थ मी आयुष्यभर न कंटाळता खाऊ शकते”; दीपिकाचं भन्नाट उत्तर
Just Now!
X