23 September 2020

News Flash

जाणून घ्या आरेमधील वृक्ष तोडीच्या मुद्द्यावर काय आहे अमित ठाकरेंचे मत

फेसबुकवरील व्हिडिओद्वारे व्यक्त केली भूमिका

मुंबईतील बहुचर्चित आरे मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीमधील २७०२ झाडं कापण्यासाठी किंवा पुनर्रोपित करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडून परवानगी देण्यात आली आहे. महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखालील वृक्ष प्राधिकरण समितीने वृक्षतोड करण्यास परवानगी दिली. मात्र त्यानंतर शनिवार आणि रविवारी मुंबईकरांनी या निर्णयाविरोधात आरेमध्ये मानवी साखळी करुन निषेध व्यक्त केला. याच पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी मुंबईकरांना या विरोधात आवाज वाढवण्याचे आवाहन केले आहे.

अमित ठाकरेंनी फेसबुकवर शेअर केलेल्या व्हिडिओद्वारे म्हटले आहे की, चार दिवसांपूर्वी मुंबईच्या वृक्ष प्राधिकरण समितीने आरेचे २७०० झाडे कापण्याचा निर्णय घेतला. या निर्णया अगोदर महानगर पालिका व एमएमआरडीएच्या पदाधिकाऱ्यांनी तेथील स्थानिकांशी चर्चा केली. या चर्चेत ८२ हजार लोकांनी त्यांच्या तक्रारी नोंदवल्या जर ८२ हजार लोकांच्या तक्रारी असतील तरीही आपण हा झाडं कापण्याचा निर्णय घेत असू तर संशय हा कुठेतरी निर्माण होणारच.

यावेळी ते हे देखील म्हणाले की, आम्ही कुठेही विकासाच्या विरोधात नाही, विकास हा नक्की व्हावा पण निसर्गाचा बळी देऊन नाही. सध्या संपूर्ण जगावर ग्लोबल वार्मिंगचे खूप मोठे संकट आहे. अॅमेझॉनच्या जंगलाला लागलेल्या आगीसाठी सगळं जग एकवटलं होतं व हळहळ व्यक्त करत होतं. हे सगळं सुरू असताना मुंबईचा जो श्वास आहे आरे हे आपण नष्ट करायला निघालो आहोत. यासारखी दुर्देवी गोष्ट नाही. म्हणून या व्हिडिओद्वारे मी सर्वांना आवाहन करतो की आवाज मोठा करा, व्यक्त व्हा मी तुमच्या सोबत आहे,  मी निसर्गासोबत आहे.

तर, वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत आपली फसवणूक झाल्याचे सांगत, समिती सदस्य असणाऱ्या डॉ. शशीलेखा सुरेशकुमार आणि डॉ. चंद्रकांत साळुंखे यांनी आपला राजीनामा महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 3, 2019 9:42 pm

Web Title: amit raj thackerays reaction on tree cutting in aare msr 87
Next Stories
1 मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी साठण्यास सुरुवात
2 शेअर बाजार गडगडला! सेन्सेक्समध्ये ८०० अंकांची घसरण
3 ‘आरेमधील झाडे तोडण्याची परवानगी आम्ही दिलीच नाही’; वृक्ष प्राधिकरणामधील तज्ज्ञांचा दावा
Just Now!
X