25 February 2021

News Flash

IPL सट्टेबाजीमध्ये फक्त अरबाज नव्हे आणखी काही बडे सेलिब्रिटी अडकण्याचे संकेत

आयपीएल सट्टेबाजी प्रकरणात अचानक अरबाज खानचे नाव समोर आले आणि लगेचच त्याची चौकशी झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अरबाज बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा भाऊ आहे.

आयपीएल सट्टेबाजी प्रकरणात अचानक अरबाज खानचे नाव समोर आले आणि लगेचच त्याची चौकशी झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अरबाज बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा भाऊ आहे तसेच त्याचे स्वत:चे सेलिब्रिटी स्टेटस आहे त्यामुळे इतक्यात तरी हा विषय थंडावणार नाही हे स्पष्ट आहे.

सध्या या प्रकरणात सहा जणांना अटक झाली असली तरी पुढच्या काही दिवसात आणखी काही बडे मासे सट्टेबाजीच्या या जाळयात अडकण्याची शक्यता आहे. गुन्हे शाखेचे डीसीपी अभिषेक त्रिमुखी यांनी प्रसारमाध्यांनी बोलताना तसे संकेत दिले आहेत.

आयपीएल सट्टेबाजी प्रकरणात सहा जणांना अटक झाली आहे. बुकी सोनू जालानच्या चौकशी दरम्यान अरबाज खानचे नाव समोर आले. अरबाजची जबानी आम्ही नोंदवून घेतली आहे तसेच आणखी काही नवीन नावे समोर आली आहेत लवकरच त्यांच्याविरोधातही कारवाई करु असे अभिषेक त्रिमुखी यांनी सांगितले.

बीसीसीआयचा संबंध नाही
अरबाज खानच्या बेटिंग प्रकरणाशी भारतीय क्रिकेट नियामंक मंडळ (बीसीसीआय) किंवा इंडियन प्रिमियर लीगचा काहीही संबंध नाही असे आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी शनिवारी स्पष्ट केले. हे प्रकरण पोलिसांकडे आहे. आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. बीसीसीआय आणि आयसीसीची भ्रष्टाचार विरोधी पथके आहेत. पोलीस त्यांच्याशी समन्वय साधून सल्लामसलत करु शकतात असे शुक्ला यांनी सांगितले.

इतक्या कोटींचे नुकसान
अरबाजने शनिवारी चौकशी दरम्यान सोनू जालानकडे आयपीएल सामन्यांवर सट्टेबाजी करत असल्याची कबुली दिली. मागच्या सहावर्षांपासून अरबाज आयपीएल सामन्यांवर सट्टा लावत होता असे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी सांगितले. या सट्टेबाजीमध्ये अरबाजचे २.८० कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. अरबाज सोनू जालानला ३ कोटी रुपये देणे होता. त्यावरुन दोघांमध्ये वाद सुरु होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2018 5:56 pm

Web Title: arbaaz khan betting racket sonu jalan ipl
Next Stories
1 चौकशी संपवून बाहेर आल्यानंतर अरबाज खान म्हणाला….
2 अरबाज खानच्या सट्टेबाजीशी आमचे काही देणे-घेणे नाही – IPL चेअरमन
3 सट्टेबाजीमध्ये अरबाज खानने गमावले इतके कोटी रुपये
Just Now!
X