30 March 2020

News Flash

आसाराम बापूंच्या सुनेकडून छळवणुकीची तक्रार दाखल

स्वयंघोषित धर्मगुरु आसाराम बापू आणि त्याचा मुलगा नारायणसाई यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

स्वयंघोषित धर्मगुरु आसाराम बापू आणि त्याचा मुलगा नारायणसाई यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. आसाराम बापूंच्या सूनेनेचं खुद्द छळवणुकीची तक्रार दाखल केलीयं.
लग्नानंतरही आसारामचा मुलगा अर्थात नारायण साईनं अनेक महिलांशी अनैतिक संबंध ठेवल्याची तक्रार नारायण साईच्या पत्नीने केली आहे. तसेच, आपल्या आई वडिलांचा आणि अनेक शिष्यांची संपत्ती या दोघांनी हडप केल्याचा आरोप तिने केला. त्यानंतर जानकीला दूरध्वनीवरून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत असल्यामुळे तिने पोलिसांकडे आपल्या कुटुंबीयांना संरक्षण देण्याची मागणीदेखील केली आहे .
आपल्या शिष्येवर अत्याचार केल्याप्रकरणी सध्या आसाराम तुरुंगात आहे. तर नारायणसाई हा सध्या सुरतमधील कारागृहात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2015 11:40 am

Web Title: asaram bapus daughter in law alleges torture by godman and husband
Next Stories
1 तलावांतील पाणीसाठा वाढला ,१४ लाख दशलक्ष लिटरची गरज
2 ‘लोकसत्ता लोकांकिके’च्या प्रवेशासाठी शेवटचे सहा दिवस
3 तुटलेल्या चाकाच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह
Just Now!
X