28 October 2020

News Flash

युवराजांनी “म्हातारीचा बुट” हवाय म्हणून बालहट्ट केला नाही म्हणजे मिळवलं! : शेलार

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना लगावला टोला; मुंबईकरांनी फक्त बालहट्टच पुरवायचे का? असा प्रश्न देखील विचारला आहे.

भाजपा नेते आशिष शेलार यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना आरे कारशेड, मुंबईतील नाईटलाईफच्या मुद्यावरून टोला लगावला आहे. आता नुकसान सहन करुन मुंबईकरांनी फक्त बालहट्टच पुरवायचे का ? एक दिवस युवराजांनी मला “म्हातारीचा बुट” हवाय म्हणून बालहट्ट केला नाही म्हणजे मिळवलं! असं शेलार यांनी म्हटलं आहे.

“पोलिसांची तयारी नसतानाही नाईटलाईफचा निर्णय लादला. तज्ञ समितीने आरे कारशेडचा दिलेला अहवाल बंधनकारक नाही म्हणे. मग आता नुकसान सहन करुन मुंबईकरांनी फक्त बालहट्टच पुरवायचे का ? एक दिवस युवराजांनी मला “म्हातारीचा बुट” हवाय म्हणून बालहट्ट केला नाही म्हणजे मिळवलं!” असं शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

चार सदस्यीय मेट्रो कारशेड समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मेट्रो-३ प्रकल्पासाठी आरे कॉलनीत जागा योग्य असल्याचा अहवाल सादर केला होता. मात्र, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या समितीचा हा अहवाल महाराष्ट्र सरकारसाठी बंधनकारक नसल्याचे म्हटले होते. यावरून शेलार यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

आणखी वाचा – आरे कारशेडचा अहवाल बंधनकारक नाही – आदित्य ठाकरे

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या कालवधीत मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीतील काही जागा निश्चित करण्यात आली होती. मात्र, पर्यावरणप्रेमींसह अनेक मुंबईकरांनी या आरे कारशेडला विरोध केला. कारण, या कारशेडसाठी शेकडो झाडांची कत्तल केली जाणर होती. यानंतर राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आलेल्या महाविकासआघाडी सरकारकडून आरे कारशेडच्या कामास स्थगितीचा निर्णय घेण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2020 3:20 pm

Web Title: ashish shelar criticizes aditya thackeray msr 87
Next Stories
1 CAA विरोधात प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या डॉक्टर काफील खानला अटक
2 घाटकोपरमध्ये कारची पोलिसांच्या जीपला धडक, वडिल आणि मुलाचा मृत्यू
3 ..त्यांनी मला ओळखलेच नाही!
Just Now!
X