सामाजिक अंतराचे भान प्रवाशांनी पाळण्याबाबत चालक-वाहकांवर जबाबदारी

मुंबई : सामाजिक अंतर ठेवण्याबाबत वारंवार सांगूनही प्रवासी ऐकत नसल्यास चालक आणि वाहकांना बसचा प्रवास तिथल्या तिथेच खंडित करण्याची सूचना बेस्ट प्रशासनाने दिली आहे. अशी परिस्थिती उद्भवल्यास अतिरिक्त प्रवाशांना सामावून घेण्याकरिता जवळच्या आगारातून जादा बस सोडण्यात येणार आहेत.

प्रवासात प्रवाशांकडून सामाजिक अंतराचा नियम पाळला जात नाही. जादा फे ऱ्या असूनही प्रवाशी बसमध्ये शेजारी बसून, गर्दीत उभे राहून प्रवास करत आहेत. सामाजिक अंतराबाबत वारंवार सूचना देऊनही प्रवाशी ऐकत नसल्याने प्रशासनाने हे टोकाचे पाऊन उचलायचे ठरविले आहे.

टाळेबंदीत वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर, पालिका कर्मचारी, बॅंक कर्मचारी, पोलीस इत्यादी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतुक सेवा उपलब्ध व्हावी यासाठी मुंबईअंतर्गतच नव्हे तर उपनगरातील ठाणे, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, वसई, विरार येथूनही मुंबईसाठी बेस्टच्या विशेष फे ऱ्या सुरू आहेत. दररोज १,२०० ते १,३०० बसफे ऱ्या बेस्ट करत आहे. त्यासाठी सुमारे तीन हजार चालक-वाहक कार्यरत असतात. मात्र इतक्या फेऱ्या चालवूनही प्रवाशी बसमध्ये एकच गर्दी करतात. अनेकदा एका बसमध्ये ७० ते ८० प्रवासी असतात. एका आसनावर एकाच प्रवाशाने बसावे, उभे राहिल्यास किमान हातभर लांब उभे राहावे, अशा सूचना प्रवाशांना वारंवार दिल्या जातात. परंतु, या सूचना धाब्यावर बसविल्या जात आहेत. यामुळे प्रवाशांबरोबरच बेस्ट कर्मचाऱ्यांमध्येही करोना संसर्गाचा धोका संभवतो. गर्दी होऊ नये म्हणून कर्मचारी जादा फे ऱ्या सोडण्याची मागणी करू लागले आहेत. प्रवाशांकडून नियम धाब्यावर बसविले जात असल्यास चालक-वाहकाने बस थांबवून जवळच्या आगारातील अधिकाऱ्याला वा बेस्टच्या टोल फ्री क्र मांकावर माहिती द्यावी, अशी सूचना प्रशासनाने के ली आहे. चालक-वाहकाने कळविल्यानंतर त्या मार्गावर जादा बस फे ऱ्या चालविण्यात येणार आहेत.

बेस्ट प्रवासाबाबत घ्यावयाची काळजी

’  एका आसनावर एकच प्रवासी

’ उभ्याने प्रवास टाळावा

’  उभ्याने प्रवास के ल्यास एकमेकांपासून हातभर लांब उभे राहावे.