News Flash

राज्यपालांना विमानातून उतरवणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी राज्यघटना शिकवू नये – अतुल भातखळकर

विधान परिषदेतील १२ राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नेमणुकीसंदर्भात आज सामनातून टीका करण्यात आली

धर्मांतर रॅकेट... उत्तर प्रदेश एटीएसने बीडच्या तुरुणांसह तिघांना केली अटक... भातखळकर यांनी सरकारकडे तपासाची मागणी

विधान परिषदेतील १२ राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नेमणुकीसंदर्भात आज सामनातून टीका करण्यात आली. शिवसेनेने भाजपा आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. १२ आमदारांची वेळेत नियुक्ती न करणे ही सरळ सरळ घटनेची पायमल्लीच आहे. उच्च न्यायालयाने आता सरळ फटकारले आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे. दरम्यान आता शिवसेना भाजपा आमने-सामने आली आहे. भाजपा नेत्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला सुनावाले आहे. त्यांनी ट्विट करत शिवसेनेला उत्तर दिले. अतुल भातखळकर म्हणाले, “१२ आमदारांची नियुक्ती थांबवणं ही घटनेची पायमल्ली, ‘सामना’… जनतेने दिलेल्या कौलाची पायमल्ली करून विश्वासघाताने सरकार स्थापन करणाऱ्या आणि राज्यपालांना विमानातून उतरवणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी राज्यपालांना राज्यघटना शिकवू नये.”

काय केली शिवसेनेनी टीका?

“महाराष्ट्रातले सध्याचे सरकार आपण घालवू या फाजील विश्वासावर विरोधी पक्ष जगत आहे, पण हा विश्वास म्हणजे ‘ऑक्सिजन’ नसून कार्बन डाय ऑक्साईड आहे. विषारी वायू आहे. या खटपटीत गुदमरून तडफडाल हा धोक्याचा इशारा आम्ही देत आहोत. मोडतोड तांबा-पितळ मार्गाचा अवलंब करून जुगाड करता आले, तर त्या जुगाड योजनेत सहभागी होणाऱ्यांवर खिरापतीसाठी या १२ आमदारकीचे तुकडे फेकता येतील, असे हे ‘स्वच्छ भारत अभियान’ आहे आणि त्या योजनेंतर्गत १२ आमदारांच्या नियुक्त्या रखडवून ठेवल्या आहेत. पण ही जुगाड योजना अमलात येण्याचे स्वप्न साकार होण्याची शक्यता नाही. १२ आमदारांची वेळेत नियुक्ती न करणे ही सरळ सरळ घटनेची पायमल्लीच आहे. उच्च न्यायालयाने आता सरळ फटकारले आहे. राज्यपाल महोदय, फाईल कपाटात दाबून ठेवण्यासाठी आहे की निर्णय घेण्यासाठी आहे? या न्यायालयीन ताशेऱ्यास राज्यपालांनी गांभीर्याने घेतले तर बरेच आहे. महाराष्ट्राच्या संयमाचा बांध फुटेल, असे कोणीही वागू नये. महाराष्ट्र पुरोगामी, संयमी आहे म्हणजे तो भेकड आहे असे मानू नये,” असे शिवसेनेने थेट राज्यपालांना सुनावले आहे.

राज्यपाल सहा महिन्यांपासून करीत आहेत एका फाईलचे राजकारण

“ज्येष्ठांचा व पाहुण्यांचा आदर करणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे. पण ‘भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळांच्या माथी हाणू काठी’ हेसुद्धा आमचे संतसज्जन आम्हाला सांगून गेले आहेत. राज्यपालांनी करावीत अशी अनेक कामे आहेत. फायलींवर बसून राहण्यापेक्षा ही कामे केल्याने त्यांचा नावलौकिक वाढेल. महाराष्ट्रात लसीचा तुटवडा आहे. याबाबत राज्यपालांनी केंद्राकडे पाठपुरावा केला पाहिजे. ‘तौते’ चक्रीवादळात नुकसान झाले. पंतप्रधानांनी गुजरातच्या वादळग्रस्तांना हजार कोटी दिले. मग महाराष्ट्रावर अन्याय का करता? माझ्या राज्यालाही पंधराशे कोटी द्या, अशी मागणी करून राज्यपालांनी ‘मऱ्हाटी’ जनतेची मने जिंकली पाहिजेत. हे सर्व करायचे सोडून राज्यपाल सहा महिन्यांपासून एका फाईलचे राजकारण करीत आहेत. आता तर ती फाईलही भुतांनी पळविली. राजभवनात अलीकडे कोणत्या भुताटकीचा वावर वाढला आहे? एकदा शांतीयज्ञ करून घ्यावा लागेल!,” असे सल्ला देत शिवसेनेनं राज्यपालांवर खोचक टीका केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2021 12:07 pm

Web Title: bjp mla atul bhatkhalkar criticizes shiv sena for criticizing the governor srk 94
Next Stories
1 मुंबईत आमदाराच्या पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न
2 Coronavirus मुंबई, ठाण्यात लक्षणीय रुग्णघट
3 १४ जण अद्याप बेपत्ता
Just Now!
X